नवी दिल्ली, 09 ऑगस्ट : गुगल (Google) हे दैनंदिन वापरातील एक महत्वाचं सर्च इंजिन (Search Engine) आहे. गुगलचा वापर जसा सर्चिंगसाठी केला जातो, तसाच तो महत्वाचे दस्तावेज, छायाचित्रे, व्हिडीओ स्टोअरेजसाठी (Storage) देखील केला जातो. आपली गोपनीय कागदपत्रे, फोटोज अन्य कोणत्याही व्यक्तीला अॅक्सेस (Access) करता येऊ नयेत, यासाठी ते गुगल ड्राईव्ह (Google Drive) किंवा गुगल फोटोजवर (Google Photos) स्टोअर केले जातात. मात्र गुगल ड्राईव्ह किंवा गुगल फोटोजवरील फोटोज जर डिलीट झाले तर नेमकं काय करायचं याबाबत आपल्याला माहिती नसतं. परंतु, आता याची चिंता करण्याची गरज नाही. कारण गुगल युजरला फाईल्स, फोटो आणि व्हिडिओ रिस्टोअर (Restore) करण्याची परवानगी देतं. यासाठी युजरला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. जाणून घेऊया या स्टेप्स कोणत्या आहेत ते. गुगल ड्राईव्ह किंवा गुगल फोटोजमधून डिलीट झालेले फोटो (Photos), फाइल्स (Files) आणि व्हिडीओ (Video) कसे रिस्टोअर करायचे याबाबतचे वृत्त टिव्ही नाइन हिंदीने दिले आहे. त्यानुसार, गुगल फोटोज तुम्हाला 60 दिवसांचा विंडो टाईम देते. ही वेळ फोटो किंवा मेमरीसाठी उपयुक्त ठरते. मात्र यादरम्यान तुम्हाला रिकव्हरी ऑप्शन दिसत नाही. यासाठी काही टिप्स फॉलो कराव्या लागतात. सर्वप्रथम आपल्या अँड्रॉइड टॅबलेटमध्ये गुगल फोटोज अॅपवर क्लिक करावे. त्यानंतर स्क्रिनवर जात लायब्ररी टॅबवर जाऊन क्लिक करावे. त्यानंतर टॉपवर तुम्हाला ट्रॅश फोल्डर दिसेल. येथे तुम्हाला डिलीट केलेले सर्व फोटोज दिसतील. हे वाचा - Online Shopping वेळी फ्रॉड झालाय? अशी करा तक्रार त्यानंतर जे फोटो किंवा व्हिडीओ तुम्हाला रिस्टोअर करायचे आहेत. त्यावर क्लिक करुन काही क्षण होल्ड करुन ठेवावे आणि रिस्टोअरवर क्लिक करावे. जर तुम्ही डिलीट केलेला फोटो किंवा व्हिडीओ ट्रॅशमध्ये दिसत नसेल, तर तो डिलीट करुन 60 दिवसांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे, असा त्याचा अर्थ होतो आणि तो ट्रॅशमधूनही बाहेर जातो. अशावेळी तुम्ही ट्रॅश (Trash) क्लीन केल्याने देखील तो फोटो किंवा व्हिडीओ तुम्हाला ट्रॅशमध्ये दिसत नाही. गुगल ड्राईव्हचा वेब किंवा मोबाईल व्हर्जन तुम्ही वापरत असाल, आणि त्यावेळी कोणताही फोटो चुकून तुमच्याकडून डिलीट झाला तर तुम्ही तो रिस्टोर करु शकता. जेव्हा तुम्ही एखादी फाईल किंवा फोटो डिलीट करता तेव्हा तुम्हाला गुगल एक मेसेज दर्शवते. त्यात ही फाईल किंवा हा फोटो 30 दिवसांनंतर कायमस्वरुपी डिलीट होईल, असं म्हटलेलं असतं. याचाच अर्थ असा की तुम्ही ती फाईल किंवा फोटो 30 दिवसांच्या आत रिकव्हर करु शकता. किंवा ती फाईल किंवा फोटो तुम्ही कायमस्वरुपी डिलीट करुन ट्रॅश रिकामी करु शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.