मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Google Search History कशी Delete कराल? डिलीटनंतरही कुठे स्टोर होते तुमची अ‍ॅक्टिव्हिटी

Google Search History कशी Delete कराल? डिलीटनंतरही कुठे स्टोर होते तुमची अ‍ॅक्टिव्हिटी

अनेकांना सर्च हिस्ट्री डिलीट किंवा मॅनेज करणं याबाबत माहिती नसते. गुगलवर कधी, काय सर्च केलं हे पाहता येतं. तसंच हे डिलीटही करता येतं.

अनेकांना सर्च हिस्ट्री डिलीट किंवा मॅनेज करणं याबाबत माहिती नसते. गुगलवर कधी, काय सर्च केलं हे पाहता येतं. तसंच हे डिलीटही करता येतं.

अनेकांना सर्च हिस्ट्री डिलीट किंवा मॅनेज करणं याबाबत माहिती नसते. गुगलवर कधी, काय सर्च केलं हे पाहता येतं. तसंच हे डिलीटही करता येतं.

  • Published by:  Karishma
नवी दिल्ली, 18 ऑगस्ट : अनेक जण कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मिळत नसल्यास, थेट Google Search करतात. गुगलवर अशा काही गोष्टी सर्च केल्या जातात, त्या तुम्हाला डिलीट करायच्या असतात. पण अनेकांना सर्च हिस्ट्री डिलीट किंवा मॅनेज करणं याबाबत माहिती नसते. गुगलवर कधी, काय सर्च केलं हे पाहता येतं. तसंच हे डिलीटही करता येतं. - सर्वात आधी Gmail अकाउंटवरुन Google वर लॉगइन करा. - आता गुगलवर My Activity वर क्लिक करा. इथे पहिलं सर्च दिसेल. - आता myactivity.google.com/myactivity या वेबसाईटवर जावं लागेल. - इथे अनेक पर्याय दिसतील, त्यात My Activity दिसेल. - त्यानंतर खाली सर्च क्वेरिज आणि रिझल्ट दिसेल. - इथे Item View आणि Bundle View पर्याय दिसेल. Item View मध्ये एक-एक अ‍ॅक्टिव्हिटी दिसेल. तर बंडल व्ह्यूमध्ये कॅटेगरीनुसार सर्च अ‍ॅक्टिव्हिटी दिसेल. - सर्वात वर सर्च बॉक्समध्ये तुमची अ‍ॅक्टिव्हिटी सर्च करता येईल. - आता तीन डॉट दिसतील, त्यावर क्लिक करुन तारखेनुसार अ‍ॅक्टिव्हिटी डिलीट करता येईल. Delete Activity By असा पर्याय दिसेल. त्यानुसार डिलीट करू शकता.

WhatsApp वर फॉलो करा या सोप्या Tips, अधिक सुरक्षित राहतील तुमचे चॅट्स

डिलीटनंतर इथे सेव्ह होते तुमची अ‍ॅक्टिव्हिटी - ज्यावेळी गुगल अकाउंटवरुन सर्च हिस्ट्री किंवा अ‍ॅक्टिव्हिटी डिलीट होते, त्यानंतर गुगल त्याचं काम सुरू करतो. गुगलनुसार, युजरकडून सर्च हिस्ट्री डिलीट झाल्यानंतर कंपनी आपल्या स्टोरेजमधून काही डेटा डिलीट करते. परंतु गुगल तुमचा काही डेटा डिलीट केल्यानंतरही तो कायमसाठी स्टोर ठेवतो. सर्च हिस्ट्री डिलीट झाल्यानंतरही गुगल याबाबत डेटा ठेवतो, की तुम्ही कोणत्या दिवशी काय डेटा सर्च केला होता. कंपनी बिजनेस पॉलिसीसाठी अ‍ॅक्टिव्हिटी स्टोर करत असल्याचं गुगलने सांगितलं आहे. म्हणजे तुम्ही सर्च हिस्ट्री डिलीट केली, तरी तुम्ही सर्च केलेली माहिती गुगल सर्व्हरवर स्टोर होते. जी एखाद्या खास परिस्थितीमध्ये पाहिलीही जाऊ शकते.
First published:

Tags: Google, Tech news

पुढील बातम्या