मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Google Chrome चा वापर करता का? लगेच करा अपडेट, सरकारकडून अलर्ट जारी

Google Chrome चा वापर करता का? लगेच करा अपडेट, सरकारकडून अलर्ट जारी

गुगल क्रोम अपडेट नसल्यास, हॅकर्सकडून तुमचं अकाउंट हॅक केलं जाण्याचा धोका आहे. CERT-In ने अ‍ॅडव्हायजरी जारी करत युजर्सला क्रोम ब्राउजरचं लेटेस्ट वर्जन अपडेट करण्याचं सांगितलं आहे.

गुगल क्रोम अपडेट नसल्यास, हॅकर्सकडून तुमचं अकाउंट हॅक केलं जाण्याचा धोका आहे. CERT-In ने अ‍ॅडव्हायजरी जारी करत युजर्सला क्रोम ब्राउजरचं लेटेस्ट वर्जन अपडेट करण्याचं सांगितलं आहे.

गुगल क्रोम अपडेट नसल्यास, हॅकर्सकडून तुमचं अकाउंट हॅक केलं जाण्याचा धोका आहे. CERT-In ने अ‍ॅडव्हायजरी जारी करत युजर्सला क्रोम ब्राउजरचं लेटेस्ट वर्जन अपडेट करण्याचं सांगितलं आहे.

नवी दिल्ली, 13 ऑगस्ट : देशात लाखोंच्या संख्येने लोक गुगल क्रोमचा (Google Chrome) वापर करत असतात. जर तुम्हीही यावर काम करत असाल, तर सरकारने तुमच्यासाठी एक अलर्ट जारी केला आहे. हॅकर्स तुमच्या गुगल क्रोमवर नजर ठेवत असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळे गुगल क्रोम अपडेट करणं (Google Chrome Update) अतिशय गरजेचं आहे. गुगल क्रोम अपडेट नसल्यास, हॅकर्सकडून तुमचं अकाउंट हॅक केलं जाण्याचा धोका आहे. इंडियन कम्प्यूटर एमरजेन्सी रिस्पॉन्स टीमने (CERT-In)  अ‍ॅडव्हायजरी जारी करत युजर्सला क्रोम ब्राउजरचं लेटेस्ट वर्जन अपडेट करण्याचं सांगितलं आहे.

92.0.4515.131 हे गुगल क्रोमचं लेटेस्ट अपडेट आहे. CERT-In ने दिलेल्या माहितीनुसार, गुगल क्रोमच्या सध्याच्या वर्जनमध्ये अनेक प्रकारचे डिफॉल्ट आढळले आहेत. अशात हॅकर्स सायबर (Cyber Attack) अटॅक करू शकतात. CERT-In ने जारी केलेल्या  अ‍ॅडव्हायजरीमध्ये सांगितलं, की Google Chrome मध्ये या त्रुटी बुकमार्क्स हीप बफर ओवरफ्लो एररमुळे आल्या आहेत. फाईल सिस्टम एपीआय, ब्राउजर UI किंवा पेज इन्फो UI एरर फ्री झाल्यानंतरच त्याचा वापर करावा.

Facebook अकाउंट होईल हॅक, तुमच्या फोनमधून लगेच डिलीट करा हे Apps

Computer Emergency टीमने दिलेल्या माहितीनुसार, रिमोट अटॅकर या एका स्पेशल क्राफ्टेड डॉक्युमेंटद्वारे हॅकिंग (Hacking) केलं जाऊ शकतं. रिमोट अटॅकरने योग्यरित्या काम केल्यानंतर ते सिस्टमला सहजपणे आपल्या तंत्राच्या साहाय्याने हॅक करू शकतं.

Google वर 5000% पेक्षा जास्त सर्च करण्यात ही गोष्ट, जाणून घ्या काय आहे हा शब्द?

देशाता सायबर फ्रॉडची (Cyber Fraud) वाढती प्रकरणं पाहता CERT-In कडून युजर्सला अलर्ट करण्यात आलं आहे. इंडियन कम्प्यूटर एमरजेन्सी रिस्पॉन्स टीम अर्थात CERT-In एजेन्सी मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी अंतर्गत काम करते.

First published:
top videos

    Tags: Cyber crime, Google, Online fraud, Tech news