• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • तुमचा फोन सुरक्षित ठेवण्यासाठी Google अकाऊंटमधून काढून टाका हे अ‍ॅप, अन्यथा...

तुमचा फोन सुरक्षित ठेवण्यासाठी Google अकाऊंटमधून काढून टाका हे अ‍ॅप, अन्यथा...

स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा डेस्कटॉपही हॅकर्सकडून हॅक केले जात आहेत. अशा परिस्थितीत युजर्स त्यांचा अ‍ॅक्सेस लिमिटेड करुन गुगल अकाउंटशी संबंधित थर्ड पार्टी अ‍ॅप रिमूव्ह करून स्वत:ला सिक्योर करू शकतात.

 • Share this:
  नवी दिल्ली, 3 मे : कोरोना काळात ऑनलाईन फ्रॉडच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा डेस्कटॉपही हॅकर्सकडून हॅक केले जात आहेत. अशा परिस्थितीत युजर्स त्यांचा अ‍ॅक्सेस लिमिटेड करुन गुगल अकाउंटशी संबंधित थर्ड पार्टी अ‍ॅप रिमूव्ह करून स्वत:ला सिक्योर करू शकतात. इंटरनेटवर असलेल्या अनेक गोष्टींसाठी शॉपिंग, गेमिंग, म्युझिक आणि इतर गोष्टींसाठी अनेक युजर्स गुगल अकाउंटचा वापर करतात. अशात आपण एखाद्या थर्ड पार्टी अ‍ॅपला आपल्या गुगल अकाउंटशी जोडतो. याचाच फायदा घेत हॅकर्स युजर्सच्या डिव्हाईसमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे वेळोवेळी गुगल अकाउंटशी संबंधित अ‍ॅप्स चेक करुन ते रिमूव्ह करुन हॅकिंगपासून, मोठ्या फसवणुकीपासून वाचता येऊ शकतं. अँड्रॉईड स्मार्टफोनमधू असं करा रिमूव्ह - - मोबाईलमध्ये इंटरनेट ऑन करुन ‘Google Account’ सर्च करा. - यामध्ये ‘Security’ पर्यायावर क्लिक करा. - त्यानंतर अँड्रॉईड फोनमध्ये लॉगइन केलेले सर्व गुगल अकाउंट्स दिसतील. त्यापैकी रिमूव्ह करायचं असेलल्या थर्ड पार्टी अ‍ॅपला सिलेक्ट करा. - Security मध्ये ‘third-party apps with account access’ या पर्यायामध्ये ‘Manage third-party app access’ वर क्लिक करा. - त्यानंतर सर्व थर्ड पार्टी अ‍ॅप दिसतील, ज्याकडे गुगल अकाउंटचा एक्सेस असेल. युजर्स सर्व अ‍ॅप्सवर जाऊन ‘Remove Access’ करु शकतात.

  (वाचा - Coronavirus: पल्स Oximeter खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवाच)

  लॅपटॉप आणि टॅबलेटमधून असे रिमूव्ह करा थर्ड पार्टी अ‍ॅप - - सर्वात आधी लॅपटॉपवर गुगल क्रोम ओपन करा आणि क्रोम ब्राउजरच्या एका नव्या टॅबला ओपन करा. - त्यानंतर उजव्या कॉर्नरला दिलेल्या अकाउंट आयकॉनवर टॅप करा आणि ‘Manage Your Google Account’ वर क्लिक करा. - त्यानंतर स्क्रिनच्या डाव्या बाजूला दिलेल्या ‘Security’ टॅबवर क्लिक करा.

  (वाचा - आता तुमच्या जवळचं वॅक्सिनेशन सेंटर शोधण्यासाठी WhatsAppकरणार मदत;अशी आहे प्रोसेस)

  - त्यानंतर ‘third-party apps with account access’ मध्ये ‘Manage third-party app access’ मध्ये जा. - यात सर्व थर्ड पार्टी अ‍ॅप दिसतील, ज्याकडे तुमच्या गुगल अकाउंटचा अ‍ॅक्सेस असेल. ‘Remove Access’ वर क्लिक करुन थर्ड पार्टी अ‍ॅपचा अ‍ॅक्सेस हटवता येऊ शकतो.
  Published by:Karishma Bhurke
  First published: