मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Coronavirus: पल्स Oximeter खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवाच

Coronavirus: पल्स Oximeter खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवाच

ऑक्सिजन लेवल तपासण्यासाठी ऑक्सिमीटरचा (Oximeter) वापर केला जातो. घरीच ऑक्सिजन लेवल चेक करताना फिंगरटीप ऑक्सिमीटरचा वापर केला जातो. यामुळे ब्लड ऑक्सिजन लेवल चेक सहजपणे चेक करता येते.

ऑक्सिजन लेवल तपासण्यासाठी ऑक्सिमीटरचा (Oximeter) वापर केला जातो. घरीच ऑक्सिजन लेवल चेक करताना फिंगरटीप ऑक्सिमीटरचा वापर केला जातो. यामुळे ब्लड ऑक्सिजन लेवल चेक सहजपणे चेक करता येते.

ऑक्सिजन लेवल तपासण्यासाठी ऑक्सिमीटरचा (Oximeter) वापर केला जातो. घरीच ऑक्सिजन लेवल चेक करताना फिंगरटीप ऑक्सिमीटरचा वापर केला जातो. यामुळे ब्लड ऑक्सिजन लेवल चेक सहजपणे चेक करता येते.

नवी दिल्ली, 3 मे : कोरोना रुग्णांची (Corona Patients) ऑक्सिजन लेवल कमी होत असल्याने, डॉक्टरांकडून सतत ऑक्सिजन लेवल चेक करत राहण्याचा सल्ला दिला जात आहे. ऑक्सिजन लेवल तपासण्यासाठी ऑक्सिमीटरचा (Oximeter) वापर केला जातो. मार्केटमध्ये तीन प्रकारचे ऑक्सिमीटर उपलब्ध आहेत. यात फिंगरटीप पल्स ऑक्सिमीटर, हेंडहेल्ड ऑक्सिमीटर आणि Fetal पल्स ऑक्सिमीटर सामिल आहे. घरीच ऑक्सिजन लेवल चेक करताना फिंगरटीप ऑक्सिमीटरचा वापर केला जातो. यामुळे ब्लड ऑक्सिजन लेवल चेक सहजपणे चेक करता येते. बाकी दोन ऑक्सिमीटरचा उपयोग अधिकतर रुग्णालयातच केला जातो.

फिंगरटीप ऑक्सिमीटरची किंमत बाकी दोन ऑक्सिमीटरच्या तुलनेत कमी असते. ऑक्सिमीटर खरेदी करताना काही गोष्टी फॉलो करणं महत्त्वाचं ठरतं, ज्यामुळे चांगलं ऑक्सिमीटर घेऊन, योग्य रिझल्ट दिसू शकतो.

Accuracy -

Accuracy असणं कोणत्याही पल्स ऑक्सिमीटरमध्ये सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. पल्स ऑक्सिमीटरमध्ये Accuracy चेक करण्यासाठी कोणतीही विशिष्ट पद्धत नाही, परंतु ऑक्सिमीटर खरेदी करताना त्याचे रिव्ह्यू चेक करणं गरजेचं आहे. तसंच दोन ऑक्सिमीटरमधील वॅल्यू एकच येते का हेदेखील तपासून घेता येऊ शकतं.

(वाचा - Alert! शरीरातील Oxygen लेवल तपासण्यासाठी अ‍ॅप वापरताय, तर आधी हे वाचा)

सर्टिफिकेशन -

पल्स ऑक्सिमीटर खरेदी करण्यापूर्वी सर्टिफिकेशनही पाहणं गरजेचं आहे. अनेक ऑर्गेनायझेशन ब्रँडची क्वालिटी आणि स्टँडर्ड सर्टिफाय करतात. यात FDA, RoHS, CE चे सर्टिफिकेशन उपलब्ध आहेत.

किंमत -

फिंगरटीप ऑक्सिमीटरची किंमत बाकी ऑक्सिमीटरच्या तुलनेत कमी असते. याची किंमत 1000 ते 5000 रुपयांपर्यंत असू शकते. अनेकदा याची किंमत 1000 रुपयांहूनही कमी असते. सध्या मागणी वाढल्याने याच्या किमतीतही वाढ झाली आहे. महागडं ऑक्सिमीटरचं योग्यरित्या काम करतं अस नाही. त्यामुळे स्वस्त दरातील ऑक्सिमीटरही घेता येऊ शकतं, केवळ त्यात योग्य वॅल्यू दाखवणं गरजेचं आहे.

(वाचा - तुम्ही Oximeter चा चुकीचा वापर तर करत नाही ना? केंद्राने सांगितली योग्य पद्धत)

फीचर आणि ब्रँड -

फिंगर पल्स ऑक्सिमीटर घेण्याआधी याचा ब्रँड पाहा. पल्स ऑक्सिमीटर चांगल्या ब्रँडचा घेणं फायद्याचं ठरतं. यामुळे यात मिळणारे डिस्प्ले, वॉटर रसिस्टेंट असे फीचर्स चेक करू शकतात.

First published:

Tags: Coronavirus, Tech news