नवी दिल्ली, 3 मे: भारतात 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील लोकांना कोरोना वॅक्सिन (Corona vaccine) देण्यास तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. वॅक्सिनेशनबाबत (Vaccination) लोकांना समस्या, अडचणी येऊ नये, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. खासगी रुग्णालयांशी टायअप करण्याशिवाय सोशल प्लॅटफॉर्मद्वारे (Social Platform) सहजपणे वॅक्सिनेशन सेंटर (vaccination center) कुठे आहे, हे शोधणं अधिक सोपं होण्यासाठी वेगात काम सुरू आहे. काही दिवसांपूर्वी सरकारने फेसबुकसह (Facebook) वॅक्सिनेशन सेंटरची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पाउलं उचलली होती, आता ही सुविधा व्हॉट्सअॅपवरही (WhatsApp) मिळणार आहे.
MyGov ने याबाबत एक माहिती ट्विटरवर शेअर केली आहे. ज्यात लोकांना WhatsApp वरुन त्यांच्या आसपासच्या वॅक्सिनेशन सेंटरची माहिती मिळू शकते. भारत सरकारने कोरोना व्हायरसबाबत चॅट बॉक्सची सुरुवात 2020 मध्येच केली होती. हेल्प डेस्कच्या मदतीने कोणीही कोरोनासंबंधी माहिती रियल टाईममध्ये मिळवू शकतं.
MyGov कोरोना हेल्प डेस्क आता तुम्हाला WhatsApp वर तुमच्या जवळच्या वॅक्सिनेशन सेंटरची माहिती देईल. MyGovIndia ने आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. यासाठी युजर्सला 9013151515 वर Namaste पाठवावं लागेल. त्यानंतर चॅट बॉक्स तुम्हाला ऑटोमेटेड रिस्पॉन्स देईल. याच्या मदतीने तुम्ही आपल्या जवळच्या कोविड वॅक्सिनेशन सेंटरची माहिती घेवू शकता. येथे 6 अंकी पिन कोडही टाकावा लागेल.
वॅक्सिनेशन सेंटरच्या लिस्टसह MyGovIndia चॅट बॉक्समध्ये तुम्हाला कोविड-19 वॅक्सिन रजिस्ट्रेशनची लिंक मिळेल, जी थेट कोविन (CoWin) वेबसाईटवर घेऊन जाईल. येथे तुम्हाला फोन नंबर, ओटीपी आणि आयडी प्रुफ नंबर टाकून रजिस्ट्रेशन करावं लागेल. तसंच आरोग्य सेतू अॅप, कोविड सर्विस पोर्टल किंवा उमंग अॅपवरही थेट रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं.
Find your nearest vaccination center right here, through the MyGov Corona Helpdesk Chatbot! Simply type ‘Namaste’ at 9013151515 on WhatsApp or visit https://t.co/D5cznbq8B5. Prepare, don't panic! #LargestVaccineDrive #IndiaFightsCorona pic.twitter.com/qbfFlr5G0T
— MyGovIndia (@mygovindia) May 1, 2021
हेल्प डेस्क हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषांना सपोर्ट करतं. MyGovIndia ने आपल्या ट्विटर हँडलवर याबाबत माहिती दिली आहे आणि ही संपूर्ण प्रोसेस समजावली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccination, Coronavirus, Tech news, Whatsapp