• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • Google हिस्ट्री डिलीट केल्यानंतरही समजेल कोणी काय सर्च केलं होतं, अशी आहे प्रोसेस

Google हिस्ट्री डिलीट केल्यानंतरही समजेल कोणी काय सर्च केलं होतं, अशी आहे प्रोसेस

मुलं इंटरनेटवर तुमच्या नकळत काही सर्च करत असतील, तर ते धोकादायकही ठरू शकतं. परंतु सर्च हिस्ट्री डिलीट केल्यानंतरही याबाबत माहिती मिळू शकते.

  • Share this:
    नवी दिल्ली, 29 जून : लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण आता मोबाईलचा वापर करतात. गेम खेळण्यासाठी लहान मुलं घरातील कोणाचाही मोबाईल घेतात. जवळपास सर्वच मुलांना सर्व फीचर्सची माहिती असते. इंटरनेटचा वापर, मोबाईल ऑपरेट अशा सर्वच गोष्टी त्यांना येतात. मुलं इंटरनेटवर तुमच्या नकळत काही सर्च करत असतील, तर ते धोकादायकही ठरू शकतं. परंतु सर्च हिस्ट्री डिलीट केल्यानंतरही याबाबत माहिती मिळू शकते. तसंच, जर तुमचा फोन एखाद्याच्या हातात गेल्यास त्याने तुमच्या फोनवर काही सर्च केलं का हे पाहता येऊ शकतं. गुगल हिस्ट्री डिलीट केली असेल, तरी कोणी काय सर्च केलं याची माहिती एका ट्रिकद्वारे मिळवता येईल.

    (वाचा - Google Search Trends: फ्री पॉर्नपेक्षा या गोष्टीत भारतीयांना अधिक रस)

    डिलीटेड Google सर्च हिस्ट्री - - सर्वात आधी Google Chrome ओपन करा. - उजव्या बाजूला वर तीन डॉट दिसतील. त्यावर क्लिक करा. - नवी विंडो ओपन होईल, यात सेटिंग पर्यायावर क्लिक करा.

    (वाचा - कोणालाही कळणार नाही काय सर्च केलं; Google Search History साठी असा ठेवा पासवर्ड)

    - Site Settings ऑप्शन दिसेल. त्यात सर्वात वर All Sites ऑप्शन दिसेल. इथे क्लिक करुन सर्व साईटचे डिटेल्स दिसतील.

    (वाचा - 12 वर्षांच्या मुलाकडून 3.22 लाखांची हत्यार खरेदी,आईच्या खात्यात 278 ट्रान्झेक्शन)

    Google Syns - गुगलची डिलीटेड हिस्ट्री जाणून घेण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये Google Syns ऑन असणं गरजेचं आहे. जर हा पर्याय तुमच्या फोनमध्ये ऑफ असेल. तर तुम्ही डिलीटेड हिस्ट्रीचे डिटेल्स घेऊ शकत नाहीत.
    Published by:Karishma
    First published: