• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • 12 वर्षाच्या मुलाने 3.22 लाख रुपयांची हत्यारं केली खरेदी, आईच्या खात्यातून 3 महिन्यांत 278 वेळा ट्रान्झेक्शन

12 वर्षाच्या मुलाने 3.22 लाख रुपयांची हत्यारं केली खरेदी, आईच्या खात्यातून 3 महिन्यांत 278 वेळा ट्रान्झेक्शन

एका महिलेला तीन महिन्यात 3.22 लाख रुपये गमवावे लागले आहेत. महिलेच्या खात्यातून ही रक्कम कट झाल्यानंतर तिने ऑनलाईन फ्रॉड (Online Fraud) झाल्याचं समजून पोलिसांत तक्रार दाखल केली.

 • Share this:
  नवी दिल्ली, 28 जून: ऑनलाईन गेम (Online Game) लहान मुलांसह त्यांच्या पालकांसाठीही भारी पडत आहे. असाच एक प्रकार उघडकीस आला असून एका महिलेला तीन महिन्यात 3.22 लाख रुपये गमवावे लागले आहेत. महिलेच्या खात्यातून ही रक्कम कट झाल्यानंतर तिने ऑनलाईन फ्रॉड (Online Fraud) झाल्याचं समजून पोलिसांत तक्रार दाखल केली. परंतु, हा कोणताही ऑनलाईन फ्रॉड नव्हता, तर त्या महिलेच्या 12 वर्षांच्या मुलानेच गेम लेव्हल अपग्रेड करण्यासाठी या गेममध्ये वापर होणारी हत्यारं खरेदी केल्याची माहिती पोलिसांनी दिली. छत्तीसगढमध्ये हा प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाळेत शिक्षक असलेल्या शुभ्रा यांच्या खात्यातून 8 मार्च ते 10 जून यादरम्यान 278 वेळा ट्रान्झेक्शन झालं. त्यावेळी खात्यातून 3.22 लाख रुपये गेले. याबाबत त्यांनी 11 जून रोजी पोलिसांत तक्रार केली. विशेष बाब म्हणजे पैसे काढण्यासाठी त्यांच्या मोबाईलवर एकदाही OTP आला नाही. त्यामुळे पोलिसांनी ही ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांची कोणती नवी पद्धत असल्याचं समजून त्यादृष्टीने तपास सुरू केला.

  (वाचा - तुमच्या नावाने सेक्स रॅकेट तर चालत नाही ना?असा होतोय तरुणींच्या FBफोटोचा गैरवापर)

  खात्यात लिंक मोबाईल नंबरनेच ट्रान्सफर झाले पैसे - बँकेने खात्यात लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरुनच पैशांचं ट्रान्झेक्शन झाल्याचं सांगण्यात आलं. या पैशांचा वापर ऑनलाईन गेम खेळण्यासाठी आणि गेमिंग लेव्हल अपग्रेड करण्यासाठी करण्यात आला. या मोबाईलवरुन महिलेचा मुलगा फ्री फायर (Free Fire) हा गेम खेळायचा. मुलाची चौकशी केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला.

  (वाचा - कोणालाही कळणार नाही काय सर्च केलं; Google Search History साठी असा ठेवा पासवर्ड)

  ऑनलाईम गेम पबजी, कॉल ऑफ ड्यूटी सारखाच फ्री फायर गेम देखील एक ऑनलाईन बॅटल ग्राउंड गेम आहे. हा गेम ऑनलाईन सिंगल किंवा ग्रुपमध्ये खेळता येतो. खेळणारा एक सैनिक दुसऱ्याशी लढतो. शेवटी जो वाचतो तो विजेता ठरतो. हा गेम निशुल्कदेखील आहे. लहान मुलं हा गेम आधी फ्री खेळतात आणि नंतर हळू-हळू याची सवय लागल्यानंतर गेम अपग्रेड करण्यासाठी बंदूक आणि इतर हत्यार खरेदी करण्यासाठी गेममध्ये सांगितलं जातं आणि मुलांकडून अशाप्रकारे ती गेमच्या नादात खरेदी केली जातात.
  Published by:Karishma
  First published: