नवी दिल्ली, 28 जून : अनेक जण गुगलवर (Google) काही ना काही सर्च करत असतात. काही जण खासगी, संवेदनशील माहितीही सर्च करतात. जर तुमच्या लॅपटॉप किंवा कंप्यूटरचा अॅक्सेस दुसऱ्या कोणाकडे असेल आणि तुम्ही लॉग्ड इन असाल, तर तुमचा संपूर्ण डेटा तो व्यक्ती पाहू शकतो. ज्यात तुमची सर्च हिस्ट्रीही सामिल आहे. तसंच दुसरा कंप्यूटर इतर कोणी वापरत असेल, तर तोदेखील नंतर तुमची सर्च हिस्ट्री पाहू शकतो. परंतु तुम्ही गुगलवर काय सर्च केलं हे कोणालााही समजू नये यासाठी तुम्ही गुगल सर्च हिस्ट्रीला (Google Search History) पासवर्ड (Password) ठेऊ शकता.
गुगल आपल्या युजर्सला संवेदनशील माहिती जसं, गुगल सर्च हिस्ट्री, गुगल असिस्टेंट कमांड्स, मॅप्सवर पासवर्ड लावण्याची परवानगी देतो. Google Search History ला पासवर्ड ठेवण्यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
- यासाठी सर्वात आधी आपल्या वेब ब्राउजरवर activity.google.com ओपन करा. यावेळी तुमचं गुगल अकाउंट Signed In असणं गरजेचं आहे.
- त्यानंतर Manage My Activity Verification वर क्लिक करा. इथे Require Extra Verification सिलेक्ट करा आणि Save वर क्लिक करा.
- नंतर युजरला आपला गुगल अकाउंट पासवर्ड टाकावा लागेल. त्यानंतर Google Search History पासवर्डने प्रोटेक्टेड होईल.
जर सर्च हिस्ट्रीचा पासवर्ड हटवायचा असेल, तर पुन्हा याच स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. पण Don't Require Extra Verification वर सिलेक्ट करावं लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.