मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Google Search Trends: फ्री पॉर्नपेक्षा या गोष्टीत भारतीयांना अधिक रस; अहवालात हैराण करणारी बाब समोर

Google Search Trends: फ्री पॉर्नपेक्षा या गोष्टीत भारतीयांना अधिक रस; अहवालात हैराण करणारी बाब समोर

लोक घरी बसून सर्वात जास्त काय सर्च करत आहेत याबाबत गुगलकडून (Google) हैराण करणारी माहिती समोर आली आहे.

लोक घरी बसून सर्वात जास्त काय सर्च करत आहेत याबाबत गुगलकडून (Google) हैराण करणारी माहिती समोर आली आहे.

लोक घरी बसून सर्वात जास्त काय सर्च करत आहेत याबाबत गुगलकडून (Google) हैराण करणारी माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली, 22 जून : कोरोना काळात अनेक जण घरातच आहेत. भारत अशा देशांमध्ये येतो, जिथे इंटरनेट स्वस्त आहे. अशात लोक घरी बसून सर्वात जास्त काय सर्च करत आहेत याबाबत गुगलकडून (Google) हैराण करणारी माहिती समोर आली आहे. गुगल ट्रेंडमध्ये (Google Trend) मागील पाच वर्षातील अभ्यास केल्यानंतर पहिल्यांदा भारतीयांमध्ये फ्री पॉर्नऐवजी ट्रेडिंग अर्थात शेअर बाजार सर्वाधिक ट्रेंड करत होता. पॉर्नऐवजी लोक शेअर बाजारासंबंधी माहिती गुगलवर सर्च करत होते.

गुगल ट्रेंडमध्ये मागील पाच वर्षांतील डेटाचा अभ्यास केल्यानंतर 2020 च्या नोव्हेंबर महिन्याचा डेटा आणि या वर्षातील फेब्रुवारी आणि मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातील डेटाद्वारे ही माहिती समोर आली आहे. म्हणजेच या महिन्यांत गुगल ट्रेंडचा आलेख स्पष्टपणे दर्शवतो, की भारतीयांचा शेअर बाजाराकडे कल प्रचंड वाढला आहे. या महिन्यात Free Porn चा सर्च ग्राफ ट्रेडिंग सर्च ग्राफच्या खाली होता.

गुजरातबाबत हैराण करणारी माहिती -

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये सर्वसाधारणपणे गुजराती लोकांचा कब्जा असल्याचं मानलं जातं. परंतु गुजरातबाबत हैराण करणारी बाब समोर आली आहे. इतर राज्यांच्या तुलनेत गुजरात आणि मिझोराममध्ये फ्री पॉर्न सर्वाधिक सर्च करण्यात आलं. मिझोराम सर्व राज्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. मिझोराममध्ये फ्री पॉर्न सर्च करण्याचं प्रमाण 96 टक्के तर, स्टॉक ट्रेडिंग सर्चचं प्रमाण 4 टक्के आहे.

पश्चिम भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत गुजरातमध्ये फ्री पॉर्नसंबंधी अधिक सर्च केलं गेलं. इथे फ्री पॉर्न सर्च करण्याची टक्केवारी 76 आणि स्टॉक ट्रेडिंग सर्च टक्केवारी केवळ 24 आहे.

(वाचा - तु्म्हीही पॉर्न सर्च किंवा तुमच्या एक्सला स्टॉक केलं आहे का? Google ने आता उचललं मोठं पाऊल)

शेअर बाजार ट्रेडिंग सर्च करण्यात महाराष्ट सर्वात पुढे -

शेअर बाजारासंबंधी माहिती सर्च करण्यात भारतात महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रानंतर दक्षिण भारतातील राज्य शेअर मार्केटबाबत सर्वाधिक सर्च करतात.

महाराष्ट्रात शेअर बाजार सर्च इंटरेस्ट रेट 100 टक्के, तर गुजरातमध्ये 78 टक्के आहे. कर्नाटक, केरळ, तमिळनाडूमध्ये सर्च इंटरेस्ट रेट 94, 95, 85 असा आहे.

मागील वर्षात स्टॉक ट्रेडिंगमध्ये लोकांची आवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 8 ते 14 नोव्हेंबरमध्ये यात अचानक अतिशय मोठी वाढ झाली.

First published:
top videos

    Tags: Google, Maharashtra, Porn sites, Share market, Tech news