नवी दिल्ली, 3 जून: पॅन नंबर आधार कार्डशी लिंक (PAN card-Aadhaar Link) करण्याची शेवटची तारीख वाढवण्यात आली आहे. तुम्ही अजूनही पॅन कार्ड आधारशी लिंक केलं नसेल, तर 30 जून 2021 पर्यंत लिंक करण्याची संधी आहे. पॅन-आधार लिंक करणं अनिवार्य आहे. पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक न केल्यास, पॅन कार्ड वैध मानलं (Invalid Pan Card) जाणार नाही. जर तुम्ही PAN-Aadhaar केलं असेल, तर याचं स्टेटसही ऑनलाईन (PAN-Aadhaar link status) चेक करू शकता.
पॅन (PAN) कार्ड आधारशी (Aadhaar) लिंक न केल्यास, मोठी समस्या येऊ शकते. आयकर कायद्याच्या कलम 139AA अंतर्गत पॅन अवैध मानलं जाईल. पॅन कार्ड लिंक न झाल्याच्या स्थितीत पुढील वेळेस ऑनलाईन ITR फाईल करता येणार नाही. अशा परिस्थितीत टॅक्स रिफंड अडकू शकतो. PAN Card अवैध मानलं जाईल.
पॅन कार्ड-आधार लिंक कसं कराल?
- पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी इनकम टॅक्सच्या ई-फाइलिंग वेबसाईटवर जा.
- साईटवर पेजच्या डाव्या बाजूला 'क्विक लिंक्स'चा ऑप्शन दिसेल. इथे 'Link Aadhaar' ऑप्शनवर क्लिक करावं लागेल.
- इथे पॅन कार्ड, आधार कार्ड आणि नाव एंटर करावं लागेल. त्यानंतर OTP येईल.
- OTP टाकल्यानंतर आधार आणि पॅन लिंक होईल.
- इनकम टॅक्स डिपार्टमेंट तुमचे डिटेल्स क्रॉसचेक करतं, की तुमच्या आधार आणि पॅन कार्डची माहिती वॅलिड आहे की नाही.
SMS द्वारे लिंक करा पॅन कार्ड -
मोबाईलद्वारे पॅन कार्ड आधारशी लिंक करता येतं. इनकम टॅक्स डिपार्टमेंटने दिलेल्या माहितीनुसार, 567678 किंवा 56161 वर SMS पाठवून पॅन-आधार लिंक करता येतं.
PAN-Aadhaar link status असं तपासा -
- सर्वात आधी www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर जा.
- 'Quick links' मध्ये 'Link Aadhaar' वर क्लिक करा.
- त्यानंतर एक नवं पेज ओपन होईल.
- या पेजवर सर्वात वरच्या बाजूला एक हायपरलिंक असेल, त्यावर स्टेटस जाणून घेण्यासाठी क्लिक करा.
- त्यावर क्लिक केल्यानंतर पॅन कार्ड आणि आधार कार्डचे डिटेल्स भरावे लागतील.
- View Link Aadhaar status वर क्लिक करुन, तुमचं पॅन कार्ड आधारशी लिंक आहे की नाही, ते समजेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aadhar card, Pan card, Tech news