मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

चुकीच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर झाल्यास कसे मिळतील परत? ही आहे प्रोसेस

चुकीच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर झाल्यास कसे मिळतील परत? ही आहे प्रोसेस

कधीतरी चुकून नको असलेल्या दुसऱ्याच व्यक्तीला पैसे ट्रान्सफर होतात. अशावेळी घाबरुन जाऊ नका. तुम्हाला तुमचे पैसे परत मिळू शकतात, त्यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

कधीतरी चुकून नको असलेल्या दुसऱ्याच व्यक्तीला पैसे ट्रान्सफर होतात. अशावेळी घाबरुन जाऊ नका. तुम्हाला तुमचे पैसे परत मिळू शकतात, त्यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

कधीतरी चुकून नको असलेल्या दुसऱ्याच व्यक्तीला पैसे ट्रान्सफर होतात. अशावेळी घाबरुन जाऊ नका. तुम्हाला तुमचे पैसे परत मिळू शकतात, त्यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 2 जून : कोरोना काळात (COVID-19 Pandemic) अधिकतर ट्रान्झेक्शन्स डिजीटल (Digital transection), ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. दररोजची खरेदी किंवा मोठे पेमेंट्सही ऑनलाईन बँकिंग (Online Banking) किंवा मोबाईल वॉलेटमधून केले जात आहे. परंतु कधीतरी चुकून नको असलेल्या दुसऱ्याच व्यक्तीला पैसे ट्रान्सफर होतात. अशावेळी घाबरुन जाऊ नका. तुम्हाला तुमचे पैसे परत मिळू शकतात, त्यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. महत्त्वाची बाब म्हणजे, चुकीच्या व्यक्तीला गेलेले पैसे त्याचवेळी पुन्हा मिळू शकतात, जेव्हा समोरचा व्यक्ती तुमचे पैसे परत करण्यास तयार असेल. अन्यथा, तुमच्याकडे कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार असतो.

बँकिंग ट्रान्झेक्शन्सवेळी अकाउंट नंबर, IFSC कोड किंवा दोन्ही टाइपिंग एरर समस्या येते, तर अनेकदा तांत्रिक बिघाडामुळेही असं होऊ शकतं. अशात अस्तिस्तात नसलेल्या खात्यावर पैसे गेल्यास, ते पैसे आपोआप परत येतात. परंतु जर एखाद्या व्यक्तीच्या खात्यात पैसे गेले, तर तुम्ही बँकेच्या मदतीने ठरलेल्या निमयमांनुसार पैसे परत घेऊ शकता. जर या प्रकरणात बँकेच्या बाजूने दुर्लक्ष होत असेल, तर तुम्ही बँक लोकापालकडे याबाबत तक्रार करू शकता.

सर्वात आधी चुकीच्या ट्रान्झेक्शन्सची माहिती लवकरात लवकर बँकेला देणं गरजेचं आहे. याबाबतचा तपशील देताना तुम्हाला हे सांगावं लागेल, की पैसे चुकीच्या खात्यात गेले आहेत. पैसे कोणाच्या खात्यात पाठवायचे होते आणि कोणाच्या खात्यात गेले हेदेखील बँकेला सांगावं लागेल. बँकेला संपूर्ण प्रकरणाची माहिती मेलद्वारे द्यावी लागेल आणि याचा संपूर्ण ट्रॅक रेकॉर्ड ठेवावा लागेल.

(वाचा - तुमच्या कामाची गोष्ट! फोन Reset करण्याआधी या गोष्टी विसरू नका, होऊ शकतं नुकसान)

बँक या संपूर्ण प्रकरणात एक फॅसिलिटेटर म्हणजेच सुविधा देणारी म्हणून काम करेल. ज्या खात्यात चुकून तुमचे पैसे गेले आहे, त्या खात्याची ब्राँच, नाव, कॉन्टॅक्ट नंबर डिटेल्स बँक तुम्हाला काढून देऊ शकेल.

ज्या खात्यात चुकून पैसे गेले आहेत, तोदेखील तुमच्याच बँकेचा ग्राहक असेल, तर बँक तुमच्याद्वारे बेनेफिशिअरीशी संपर्क करून पैसे पुन्हा पाठवण्यासाठी रिक्वेस्ट करेल. बेनेफिशिअरी सहमत झाल्यानंतर 7 वर्किंग डेजमध्ये तुमच्या खात्यात पैसे येतील.

जर चुकून पैसे गेलेला व्यक्ती तुमच्या बँकेचा ग्राहक नसेल, म्हणजेच बेनेफिशिअरी दुसऱ्या बँकेचा असेल, तर तुम्हाला स्वत: त्या बँकेत जाऊन बँक मॅनेजरशी बोलून त्यावर मार्ग काढावा लागेल.

(वाचा - Fake Alert! WhatsApp वर आलेल्या या लिंकवर चुकूनही क्लिक करू नका, अन्यथा...)

सर्वसाधारणपणे, दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्यास, ते पैसे व्यक्ती परत पाठवतो. परंतु काही वेळा पैसे पाठवण्यास नकार दिला जातो. अशावेळी प्रोसेस काहीशी कठीण होते. यात तुम्हाला तुमच्या बँकेचे पूर्ण डिटेल्स द्यावे लागतील. आयडी प्रुफ, अ‍ॅड्रेस, बँकेकडून मागितली गेलेली इतर माहिती द्यावी लागेल. यात मेलद्वारे कम्युनिकेशन करावं लागेल, जेणेकरुन ट्रॅक रेकॉर्ड ठेवण्यास मदत होईल. समोरच्या व्यक्तीने पैसे परत करण्यास शेवटपर्यंत नकार दिल्यास, तुम्ही कायदेशीर कारवाई करू शकता.

First published:

Tags: Tech news