मराठी बातम्या /बातम्या /मनी /PF खातं आपोआप होतं बंद; EPFO चा हा नियम माहितेय का? अडकू शकतात पैसे

PF खातं आपोआप होतं बंद; EPFO चा हा नियम माहितेय का? अडकू शकतात पैसे

तुम्हाला PF अकाउंटही (Provident Fund account) आपोआप बंद होऊ शकतं, हे माहितेय का? असं झाल्यास PF मध्ये जमा असलेले पैसे अडकू शकतात. त्यामुळे EPFO नियम माहित असणं गरजेचं आहे.

तुम्हाला PF अकाउंटही (Provident Fund account) आपोआप बंद होऊ शकतं, हे माहितेय का? असं झाल्यास PF मध्ये जमा असलेले पैसे अडकू शकतात. त्यामुळे EPFO नियम माहित असणं गरजेचं आहे.

तुम्हाला PF अकाउंटही (Provident Fund account) आपोआप बंद होऊ शकतं, हे माहितेय का? असं झाल्यास PF मध्ये जमा असलेले पैसे अडकू शकतात. त्यामुळे EPFO नियम माहित असणं गरजेचं आहे.

नवी दिल्ली, 3 जून: एम्प्लॉइज प्रोविडेंट फंड (EPF) बाबत अनेकांच्या मनात अनेक प्रश्न असतात. ते पैसे कधी काढू शकतात, पैसे काढल्याने काय नुकसान काय फायदा होतो, EPF खातं ट्रान्सफर कसं करायचं असे अनेक प्रश्न अनेकांना पडतात. परंतु तुम्हाला PF अकाउंटही (Provident Fund account) आपोआप बंद होऊ शकतं, हे माहितेय का? असं झाल्यास PF मध्ये जमा असलेले पैसे अडकू शकतात. त्यामुळे EPFO नियम माहित असणं गरजेचं आहे.

कधी बंद होतं EPF खातं?

जर तुमची जुनी कंपनी बंद झाली असेल आणि जर तुम्ही ते पैसे नव्या कंपनीमध्ये ट्रान्सफर केले नाहीत किंवा काढले नाहीत, तर अशा स्थितीत खातं बंद होऊ शकतं. परंतु यासाठी 36 महिन्यांपर्यंत कोणतंही ट्रान्झेक्शन झालं नसल्यास अशी अॅक्शन घेतली जाते. म्हणजे 3 वर्षांपर्यंत इनऑपरेटिव्ह खातंदेखील अॅक्टिव्ह राहतं.

3 वर्षांपर्यंत कोणतंही ट्रान्झेक्शन न झाल्यास, तुमचं EPF अकाउंट निष्क्रिय कॅटेगरीमध्ये टाकलं जातं. त्यानंतर त्या निष्क्रिय झालेल्या अकाउंटमधून पैसे काढण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागते. बँकेच्या मदतीने KYC द्वारे तुम्ही पैसे काढू शकता. निष्क्रिय खात्यावर व्याजदेखील मिळत राहतं.

(वाचा - तुमच्याकडे नाही हा PF चा नंबर? घरबसल्या कसा काढायाचा PF खात्याचा UAN?)

EPFO सर्कुलर?

EPFO ने एका सर्कुलरमध्ये अर्थात परिपत्रकात, निष्क्रिय खात्यांशी संबंधित क्लेम निकाली काढण्यासाठी काळजी घेणं आवश्यक असल्याचं सांगितलं होतं. फसवणुकीचा धोका कमी होऊन, योग्य दावेदारांना क्लेमची रक्कम दिली जावी, याची योग्य काळजी घेतली पाहिजे असंही EPFO ने म्हटलं होतं.

काय असतं Inactive PF अकाउंट?

Inactive PF म्हणजे अशी अकाउंट ज्यात 36 महिन्यांहून अधिक काळ कोणतंही ट्रान्झेक्शन, कोणतंही कॉन्ट्रिब्यूशन झालेलं नाही. अशी खाती EPFO कडून निष्क्रिय कॅटेगरीमध्ये टाकली जातात.

Inactive PF accountF कोण करतं सर्टिफाईड?

निष्क्रिय पीएफ खात्यांसंबंधीत (Inactive PF account) क्लेम निकाली काढण्यासाठी, कर्मचाऱ्याच्या मालकाने त्याला सर्टिफाईड करणं आवश्यक आहे. परंतु ज्या कर्मचाऱ्यांची कंपनी बंद आहे आणि क्लेम सर्टिफाईड करण्यासाठी कोणीही नसेल, तर असे क्लेम बँक KYC कागदपत्रांच्या आधारे सर्टिफाईड केलं जाऊ शकतं.

(वाचा - तुमच्याकडे आहे 5 रुपयांची ही नोट? घरबसल्या 30 हजार रुपये कमावण्याची संधी)

कोणते कागदपत्र असणं गरजेचं?

KYC साठी कागदपत्रांमध्ये पॅन कार्ड, वोटर आयडी, पासपोर्ट, रेशन कार्ड, ESI आयडी, ड्रायव्हिंग लायसन्स सामिल आहे. त्याशिवाय आधार कार्डचीही गरज लागू शकते. त्यानंतर असिस्टेंट प्रोविडेंट फंड कमिश्नर अर्थात सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त किंवा अन्य अधिकारी रकमेनुसार खात्यातून पैसे काढण्याची किंवा ट्रान्सफर करण्याची मंजुरी देतील.

50 हजारहून अधिक रक्कम असल्यास, पैसे असिस्टेंट प्रोविडेंट फंड कमिश्नरच्या मंजुरीनंतर काढले जाऊ शकतात किंवा ट्रान्सफर होऊ शकतात. त्याशिवाय 25 हजारहून अधिक आणि 50 हजारहून कमी रक्कम असल्यास फंड ट्रान्सफर किंवा विड्रॉल करण्याची मंजुरी अकाउंट ऑफिसर देऊ शकेल. जर रक्कम 25 हजारहून कमी असेल, तर त्यासाठी डीलिंग असिस्टेंट मंजुरी देऊ शकेल.

30 हजार कोटीहून अधिक फंड निष्क्रिय -

EPFO नुसार, निष्क्रिय खात्यांमध्ये 30 हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा आहे. अशा खात्यातील पैसे क्लेम करण्यासाठी कोणीही न आल्यास EPFO त्या अकाउंटमधील पैसे आपल्या खात्यात घेतं.

First published:

Tags: Epfo news, Pf, PF Amount, PF Withdrawal