नवी दिल्ली, 20 मे : फेसबुकवर ऑनलाईन आहात? पण हे तुमच्या मित्रांना कळू द्यायचं नसेल तर यासाठी एक ट्रिक आहे. Facebook कडून यासाठी एक पर्याय देण्यात आला आहे. यामुळे जरी तुम्ही फेसबुकवर ऑनलाईन असाल, तरी तुमच्या फ्रेंड लिस्टमध्ये तुम्ही ऑफलाईन असल्याचं दिसेल.
ऑनलाईन स्टेटसबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ग्रीन डॉट म्हणजे युजर ऑनलाईन असल्याचं समजतं. परंतु हे अॅक्टिव्ह स्टेटस बंद करायचं असल्यास, यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
Facebook वेबवर ग्रीन डॉट ऑफ करण्यासाठी -
यासाठी Facebook वेब ओपन करुन मेसेंजर आयकॉनवर क्लिक करा. हे होमपेजच्या डाव्या बाजूला साईडबारमध्ये दिसेल. त्यानंतर थ्री-डॉट मेन्यू बटणावर क्लिक करा. त्यानंतर Preferences ऑप्शनवर क्लिक करा. ऑप्शन मेन्यूमध्ये Trun off active Status वर क्लिक करा.
यात Active Status on Facebook हे हाईड करण्याचा ऑप्शन सिलेक्ट करुन OK वर क्लिक करा. त्यानंतर ही सेटिंग सेव्ह करा. यामुळे फेसबुक वेबवर तुमचं अॅक्टिव्ह स्टेटस दिसणार नाही.
Facebook अँड्रॉईड अॅप -
सर्वात आधी फेसबुक अँड्रॉईड अॅप ओपन करा. त्यानंतर उजव्या बाजूला टॉपला असलेल्या Messenger आयकॉनवर क्लिक करा. यासाठी फोनमध्ये Messenger अॅप असल्यास फायद्याचं ठरेल. Messenger App मध्ये चॅट्समध्ये जा. त्यानंतर मेसेज सेटिंगमध्ये Active Status ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर Show when you're active ऑफ करा. त्यामुळे फेसबुकवर तुमच्या नावाच्या पुढे ग्रीन डॉट येणार नाही.
Facebook iOS -
फेसबुक आयफोन किंवा आयपॅडवर ओपन करा. त्यानंतर हेमबर्गर मेन्यू (तीन पॅरलल लाईन) वर क्लिक करा. आता Settings and Privacy सेक्शनमध्ये जा. येथे Active Status वर क्लिक करुन Show when you're active पर्याय ऑफ करा. त्यानंतर कन्फर्म करा. यामुळे तुमचं ऑनलाईन स्टेटस तुमचे फ्रेंड्स पाहू शकणार नाहीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.