• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • कोण पाहतंय तुमचा WhatsApp Profile Photo? ही आहे सोपी ट्रिक

कोण पाहतंय तुमचा WhatsApp Profile Photo? ही आहे सोपी ट्रिक

व्हॉट्सअ‍ॅपवर आपला प्रोफाईल फोटो (DP) ठेवला जातो. पण तुमचा फोटो कोणी-कोणी पाहिलं ते तपासता येत नाही. परंतु एक अशी ट्रिक आहे, ज्याद्वारे तुमचा WhatsApp DP कोणं पाहतंय ही जाणून घेता येईल.

  • Share this:
    नवी दिल्ली, 19 मे : अनेकांच्या आयुष्यात स्मार्टफोन त्यात व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) महत्त्वाचा भाग झाला आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर केवळ चॅटच नाही, तर व्हिडीओ कॉल, ऑडिओ कॉल, शेअरिंगच्या अनेक सुविधाही मिळतात. त्यामुळे जवळपास प्रत्येक स्मार्टफोन युजर व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतो. व्हॉट्सअ‍ॅपवर आपला प्रोफाईल फोटो (DP) ठेवला जातो. पण तुमचा फोटो कोणी-कोणी पाहिलं ते तपासता येत नाही. परंतु एक अशी ट्रिक आहे, ज्याद्वारे तुमचा WhatsApp DP कोणं पाहतंय ही जाणून घेता येईल. कोण पाहतंय तुमचा फोटो? - तुमचा व्हॉट्सअ‍ॅप प्रोफाईल फोटो कोण पाहतंय, हे पाहण्यासाठी एक अ‍ॅप डाउनलोड करावं लागेल. - सर्वात आधी गुगल प्ले स्टोरवर तुमच्या अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये WhatsApp Who Viewed Me या WhatsApp Tracker नावाचं अ‍ॅप डाउनलोड करावं लागेल. - हे अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर युजरला 1mobile market हेदेखील डाउनलोड करावं लागेल. कारण या अ‍ॅपशिवाय WhatsApp Who Viewed Me डाउनलोड होणार नाही. 1mobile market आपोआपच डाउनलोड होईल. तु्म्हीही पॉर्न सर्च केलं का? Google ने आता उचललं मोठं पाऊल - WhatsApp Who Viewed Me अ‍ॅप इन्स्टॉल झाल्यानंतर, युजर त्या लोकांना पाहू शकतात, जे तुमचा व्हॉट्सअ‍ॅप प्रोफाईल फोटो तर पाहतात, पण तुम्हाला याची माहिती नसते. या अ‍ॅपमध्ये युजरला केवळ त्या लोकांबद्दल माहिती मिळेल, ज्यांनी गेल्या 24 तासांत तुमचा DP पाहिला असेल. अ‍ॅप युजरसमोर Contact कॅटेगरी ठेवेल, ज्यात App तुमचा फोटो पाहणाऱ्यांची लिस्ट समोर ठेवेल. Smartphone चोरी झाल्यास, या सरकारी पोर्टलच्या मदतीने असा करा ब्लॉक हे अ‍ॅप स्मार्टफोनमध्ये डाउनलोड करण्याआधी पूर्णपणे वेरिफाय करा. सध्या हे अ‍ॅप युजर्ससाठी किती सेफ आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे युजर्स आपल्या रिस्कवरच हे अ‍ॅप डाउनलोड करू शकतात आणि या ट्रिकचा वापर करू शकतात.
    Published by:Karishma Bhurke
    First published: