मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Smartphone चोरी झाल्यास, या सरकारी पोर्टलच्या मदतीने असा करा ब्लॉक

Smartphone चोरी झाल्यास, या सरकारी पोर्टलच्या मदतीने असा करा ब्लॉक

स्मार्टफोन चोरी झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या पैशांचं नुकसान, तर होतंच शिवाय फोनमध्ये सेव्ह असलेला खासगी डेटादेखील धोक्यात येतो. त्यामुळे यापासून बचाव होण्यासाठी फोन चोरी झाल्यास, तो लगेच ब्लॉक करणं अतिशय महत्त्वाचं आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 18 मे : सध्याच्या काळात स्मार्टफोन प्रत्येकासाठी अतिशय महत्त्वाची वस्तू झाला आहे. कितीही किंमतीचा असला, तरी प्रत्येकासाठी आपला फोन खासच असतो. बाजारात अनेक स्मार्टफोन उपलब्ध असून बजेट ते प्रीमियम असे अनेक फोन आहेत. फोनच्या वाढत्या मागणीसह याच्या चोरीचंही प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. स्मार्टफोन चोरी झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या पैशांचं नुकसान, तर होतंच शिवाय फोनमध्ये सेव्ह असलेला खासगी डेटादेखील धोक्यात येतो. त्यामुळे यापासून बचाव होण्यासाठी फोन चोरी झाल्यास, तो लगेच ब्लॉक करणं अतिशय महत्त्वाचं आहे.

मोबाईल फोन हरवल्यानंतर, सर्वात आधी पोलीस स्टेशनमध्ये एक FIR दाखल करावी लागेल. मोबाईल चोरीचा रिपोर्ट ऑफलाईनसह ऑनलाईनही दाखल करता येतो. FIR दाखल केल्यानंतर याची कॉपी आणि कम्प्लेंट नंबर स्वत:कडे ठेवा.

त्यानंतर सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टरच्या वेबसाईटवर ceir.gov.in जावं लागेल. CEIR कडे देशातील प्रत्येक मोबाईल फोनचा डेटा फोन मॉडेल, सिम, IMEI नंबर उपलब्ध असतो, ज्याच्या मदतीने चोरी झालेला फोन शोधता येऊ शकतो. यामुळे फोन ब्लॉक किंवा अनब्लॉक करता येऊ शकतो.

(वाचा - घाईगडबडीत हे 5 बनावट CoWin वॅक्सिन अ‍ॅप डाउनलोड करू नका, सरकारचा इशारा)

ceir.gov.in वर क्लिक केल्यानंतर तीन ऑप्शन Block/Lost Mobile, Check Request Status आणि Un-Block Found Mobile मिळतील. चोरी झालेला फोन ब्लॉक करण्यासाठी Stolen/Lost Mobile ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर नवं पेज ओपन होईल त्यात, आपल्या मोबाईल फोनची सर्व माहिती द्यावी लागेल.

(वाचा - Hacking आणि Online Fraud पासून करा तुमच्या Smartphoneचा बचाव,पाहा सोप्या ट्रिक्स)

मोबाईल माहितीमध्ये मोबाईल नंबर, IMEI नंबर, डिव्हाईस ब्राँड, कंपनी, फोन खरेदीचं इनव्हॉईस, फोन हरवल्याची तारीख सामिल आहे. त्याशिवाय राज्य, जिल्हा, फोन चोरी झाल्याची जागा, कम्प्लेंट नंबर दाखल करावा लागेल. त्याशिवाय FIR कॉपी अपलोड करावी लागेल.

त्यानंतर अॅड मोर कम्प्लेंटवर क्लिक करावं लागेल, ज्यात मोबाईलच्या मालकाचं नाव, पत्ता, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि आयडेंटिटीची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकावा लागेल.

(वाचा - ऑर्डर केलं माउथवॉश आणि डिलीव्हरीवेळी आला 13000चा स्मार्टफोन, पाहा पुढे काय झालं)

वेरिफिकेशनसाठी तुमच्या नंबरवर एक OTP येईल, त्यानंतर वेरिफिकेशन होईल. याप्रमाणे फायनल सबमिट करुन मोबाईल फोन ब्लॉक होईल. तसंच फोनबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास, तो युजरकडे पोहोचवला जाईल.

First published:

Tags: Smartphone, Tech news