मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Hacking आणि Online Fraud पासून असा करा तुमच्या Smartphone चा बचाव, पाहा सोप्या ट्रिक्स

Hacking आणि Online Fraud पासून असा करा तुमच्या Smartphone चा बचाव, पाहा सोप्या ट्रिक्स

युजर्सने आपली प्रायव्हसी सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या फोनचं लोकेशन Turn Off ठेवावं. ज्यामुळे Apps तुमचं लोकेशन ट्रॅक करू शकणार नाही.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 18 मे : सध्या स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून, त्यासोबतच हॅकिंग आणि फ्रॉडची प्रकरणंही मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. फोनच्या सेटिंगमध्ये काही बदल करुन हॅकिंग आणि ऑनलाईन फ्रॉडपासून बचाव केला जाऊ शकतो.

युजर्सने आपली प्रायव्हसी सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या फोनचं लोकेशन Turn Off ठेवावं. ज्यामुळे Apps तुमचं लोकेशन ट्रॅक करू शकणार नाही. iPhone युजर्स असल्यास, फोनच्या प्रायव्हसी सेटिंग्समध्ये जाऊन लोकेशन ऑफ करता येईल. Android Users ला लोकेशन बंद करण्यासाठी फोनच्या सेटिंगमध्ये लोकेशन टर्न ऑफ, लोकेशन हिस्ट्री तसंच Apps अॅक्सिसही हटवणं गरजेचं आहे.

फोनमध्ये अनेकदा अनेक Apps आणि वेबसाईट्स, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक, ट्विटरला लॉगइन करण्याची परवानगी देतात. परंतु असं धोकादायक ठरू शकतं. अनेक Apps युजर्सची पर्सनल माहिती फेसबुक आणि ट्विटरवरुन चोरी करतात. त्यामुळे सावध राहणं गरजेचं आहे.

(वाचा - व्हायरल बातमी खरी की खोटी?; जाणून घ्या 'फॅक्ट चेक' करण्याची सोपी पद्धत)

इंन्स्टंट ऑटो लॉक ऑप्शन फोनसाठी अतिशय आवश्यक ठरतो. जर तुम्ही फोन लॉक करणं विसरलात, तर हे फीचर एखाद्या दुसऱ्या युजरला तुमचा फोन एक्सेस करण्यापासून रोखतं. यासाठी युजर्स फोनच्या सेटिंगमध्ये ऑटो लॉक एनेबल करू शकतात.

Google युजर्सची अधिकतर अॅक्टिव्हिटी ट्रॅक करतो. प्रायव्हसी चोरी होण्यापासून वाचण्यासाठी, Google अॅडमध्ये Unable Opt out of Ads Personalization वर क्लिक करुनही हॅकिंगपासून बचाव करता येऊ शकतो.

First published:

Tags: Hacking, Online fraud, Smartphone, Tech news