जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / ऑर्डर केलं माउथवॉश आणि डिलीव्हरी बॉक्समध्ये आला 13 हजारांचा स्मार्टफोन, पाहा पुढे नेमकं काय झालं

ऑर्डर केलं माउथवॉश आणि डिलीव्हरी बॉक्समध्ये आला 13 हजारांचा स्मार्टफोन, पाहा पुढे नेमकं काय झालं

ऑर्डर केलं माउथवॉश आणि डिलीव्हरी बॉक्समध्ये आला 13 हजारांचा स्मार्टफोन, पाहा पुढे नेमकं काय झालं

मुंबईतील एका ग्राहकाने अ‍ॅमेझॉनवरुन माउथवॉश ऑर्डर केलं आणि त्याला डिलीव्हरीवेळी एक स्मार्टफोन आला. ग्राहकासाठी ही हैराण करणारी बाब होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 मे : दिग्गज ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन (Amazon)  आपल्या प्रोडक्ट्सच्या ऑन टाईम डिलीव्हरीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. अ‍ॅमेझॉनच्या डिलीव्हरीबाबतचा एक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील एका ग्राहकाने अ‍ॅमेझॉनवरुन माउथवॉश ऑर्डर केलं आणि त्याला डिलीव्हरीवेळी एक स्मार्टफोन आला. ग्राहकासाठी ही हैराण करणारी बाब होती. मुंबईतील लोकेश यांनी याबाबतची माहिती ट्विटरवरुन अ‍ॅमेझॉन इंडियाला टॅग करत दिली. त्यांनी ट्विटमध्ये, कंपनीकडून चुकून माउथवॉशऐवजी Redmi Note 10 स्मार्टफोन डिलीव्हर झाल्याचं सांगितलं. मुंबईत राहणाऱ्या लोकेश यांनी अ‍ॅमेझॉनवरुन कोलगेट माउथवॉशच्या 4 बॉटल्स ऑर्डर केल्या होत्या. त्याची किंमत 396 रुपये इतकी होती. परंतु ज्यावेळी डिलीव्हरी पॅकेट ओपन केलं, त्यावेळी त्यात Redmi Note 10 स्मार्टफोन निघाला, ज्याची किंमत 13000 रुपये आहे. ज्यावेळी मी पॅकेट ओपन केलं, त्यावेळी पॅकेजिंग लेबल माझं होतं, परंतु चालान दुसऱ्याच नावावर होतं, असं लोकेश यांनी सांगितलं. मला माउथवॉशऐवजी Redmi Note 10 स्मार्टफोन मिळाला आहे. या फोनला रिटर्न करण्यासाठी मी अ‍ॅमेझॉनला ईमेलही केला असल्याचं ते म्हणाले.

(वाचा -  Car मध्ये सॅनिटायझर वापरताना लागली आग; ‘बर्निंग कार’चा थरार VIDEO मध्ये कैद )

(वाचा -  Oxygen Level तपासण्यासाठी स्मार्टफोनमध्ये Oximeter App चा वापर धोकादायक )

ट्विटरवर लोकेश यांनी केलेल्या पोस्टवर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. लोकेश यांच्यासोबत झालेली बाब कोणासोबतही होऊ शकते. अनेकदा ऑर्डर काही एक केलं, आणि दुसरीचं वस्तू आल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. लोकेश यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात