नवी दिल्ली, 16 मे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं (Second Wave Of Corona) भयंकर रुप पाहता, सरकारने वॅक्सिनेशन (Vaccination) आणखी वेगाने होण्यासाठी जनतेला डिजीटली रजिस्ट्रेशन करण्याचं सांगण्यात आलं आहे. अशात अनेक लोक आपल्या स्लॉटसाठी, रिजस्ट्रेशन करण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. परंतु वॅक्सिनच्या कमतरतेमुळे सर्वाना स्लॉट मिळत नाही. हे संकट असतानाच, आता हॅकर्सकडून इंटरनेटवर लोकांच्या फसवणुकीचे प्रयत्न होत आहेत. लोकांचं सहजपणे रजिस्ट्रेशन करण्याच्या नावाखाली नकली आणि धोकादायक APK फाइल्स इन्स्टॉल करण्याचं सांगण्यात येत आहे. भारतीय कम्प्यूटर इमरजेंसी रिस्पॉन्स टीमने (CERT-In) लोकांना नकली CoWin वॅक्सिन रिजस्ट्रेशन अॅपबाबत इशारा दिला आहे. याबाबत एक अॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे.
भारतीय कम्प्यूटर इमरजेंसी रिस्पॉन्स टीमने लोकांना नकली CoWin वॅक्सिन रजिस्ट्रेशन अॅपबाबत इशारा देण्यासाठी एक अॅडव्हायजरी जारी केली आहे. लोकांची वॅक्सिन घेण्यासाठी, रजिस्ट्रेशन, स्लॉट मिळवण्यासाठी होणारी धडपड पाहता, सायबर क्रिमिनल्स लोकांना SMS द्वारे 5 लिंकपैकी कोणत्याही एका लिंकवर दिलेल्या APK फाईल डाउनलोड करण्यासाठी सांगतात, आणि यामुळे वॅक्सिनेशन करण्यासाठी मदत होईल असा दावाही केला जात आहे.
परंतु या APK फाईल्समुळे युजर्सच्या प्रायव्हसीला धोका निर्माण होतो. हॅकर्सकडून पाठवण्यात येणाऱ्या SMS चे शब्द वेगवेगळे असू शकतात. SMS द्वारे युजर्सला आपल्या अँड्रॉईड फोनवर पाच APK फाईल्समधील कोणत्याही फाईलला डाउनलोड करुन APK इन्स्टॉल करण्याचा सल्ला दिला जात आहे.
या APK फाईल्स इतक्या धोकादायक आहेत, की एकदा इन्स्टॉल झाल्यानंतर, APK आपोआप युजर्सच्या सर्व कॉन्टॅक्ट्समधील लोकांना APK इन्स्टॉल करण्यासाठी SMS पाठवतो. या अॅपला अनावश्यक परवानग्या मिळतात, जेणेकरुन ते युजर्सच्या फोनमधील सर्व डेटा सहजपणे अॅक्सेस करू शकतात.
हे अॅप्स कधीही चुकूनही डाउनलोड करू नका -
- Covid-19.apk
- Vaci__Regis.apk
- MyVaccin_v2.apk
- Cov-Regis.apk
- Vccin-Apply.apk
सरकार भारतात वॅक्सिनेशनची संपूर्ण प्रक्रिया डिजीटली मॅनेज करत आहे. वॅक्सिनेशनसाठी सर्व नागरिकांना CoWin वेबसाईट (cowin.gov.in) किंवा आरोग्य सेतू अॅपवर रजिस्ट्रेशन करण्याचा सल्ला दिला जात आहे. बाकी इतर अॅप्सवर केवळ वॅक्सिनची उपलब्धता ट्रॅक करता येऊ शकते, परंतु इतर अॅपमुळे रिजस्ट्रेशनसाठी मदत होणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccination, Coronavirus, Tech news