मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /23 वर्षात 4 वेळा बदलली Google च्या वाढदिवसाची तारीख, वाचा काय आहे यामागची कहाणी

23 वर्षात 4 वेळा बदलली Google च्या वाढदिवसाची तारीख, वाचा काय आहे यामागची कहाणी

1998 सप्टेंबर महिन्यात कॅलिफोर्नियाच्या स्टॅनफोर्ड यूनिव्हर्सिटीचे दोन विद्यार्थी Larry Page आणि Sergey Brin यांनी Google चा शोध लावला होता.

1998 सप्टेंबर महिन्यात कॅलिफोर्नियाच्या स्टॅनफोर्ड यूनिव्हर्सिटीचे दोन विद्यार्थी Larry Page आणि Sergey Brin यांनी Google चा शोध लावला होता.

1998 सप्टेंबर महिन्यात कॅलिफोर्नियाच्या स्टॅनफोर्ड यूनिव्हर्सिटीचे दोन विद्यार्थी Larry Page आणि Sergey Brin यांनी Google चा शोध लावला होता.

नवी दिल्ली, 27 सप्टेंबर : सर्च इंजिन Google आज आपला 23वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी गुगलने खास डुडल (Doodle) तयार केलं आहे. Doodle मध्ये केकवर 23 लिहिलेलं असून, मेणबत्तीच्या डिझाइनसह डुडल सुंदररित्या तयार करण्यात आलं आहे. इंटरनेट सर्च इंजिन गुगल आज जगातील सर्वात मोठा प्लॅटफॉर्म आहे. कोणाला कोणतीही माहिती हवी असल्यास प्रत्येक जण Google Search करतो आणि हवी ती माहिती मिळतो. Google कडे जवळपास प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळतं, माहिती मिळते.

1998 सप्टेंबर महिन्यात कॅलिफोर्नियाच्या स्टॅनफोर्ड यूनिव्हर्सिटीचे दोन विद्यार्थी Larry Page आणि Sergey Brin यांनी Google चा शोध लावला होता. याची सुरुवात एक रिसर्च प्रोजेक्ट म्हणून झाली होती. Larry Page आणि Sergey Brin यांनी Google.stanford.edu अॅड्रेसवर इंटरनेट सर्च इंजिन बनवलं होतं. Larry Page आणि Sergey Brin या दोघांनी हे अधिकृतरित्या लाँच करण्यापूर्वी याचं नाव Backrub ठेवलं होतं. त्यानंतर हे नाव बदलून Google करण्यात आलं.

Google New Feature: या खास फीचरद्वारे Lock करता येणार फोटो-व्हिडीओ, स्क्रिनशॉटही घेता येणार नाही

या दोन विद्यार्थ्यांनी, आम्ही आमच्या सिस्टमचं नाव Google ठेवलं असल्याचं सांगितलं, कारण हे 10100 किंवा google साठी कॉमन स्लेलिंग आहे आणि हे आमच्या लार्ज स्केल Search Engine बनवण्यासाठीच्या ध्येयासाठी योग्य असल्याचं म्हटलं होतं.

कोणालाही कळणार नाही तुम्ही काय सर्च करताय; Google Search History साठी असा ठेवा पासवर्ड

Google आज जगातील सर्वात मोठं सर्च इंजिन आहे. गुगलद्वारे आज 100 हून अधिक भाषांमध्ये सर्च करता येतं. लॅपटॉप, मोबाईल, कंप्यूटरमध्ये सर्च इंजिन गुगलचा वापर होतो.

एका जन्माच्या अनेक तारखा!

Google चा आतापर्यंत चार वेगवेगळ्या दिवशी वाढदिवस साजरा झालेला आहे. 7 सप्टेंबर 2005 ला पहिल्यांदा गुगलचा वाढदिवस (Google’s First Birth Day Celebration) साजरा झाला होता. त्यानंतर ही तारीख बदलून कधी 8 सप्टेंबर झाली, तर कधी 26 सप्टेंबर. सध्या 27 सप्टेंबर हा दिवस गुगलचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. यामागे एक खास कारणदेखील आहे. 27 सप्टेंबर या दिवशी गुगलने पेजेस सर्च करण्याचा विक्रम केला होता. त्यामुळे हाच दिवस वाढदिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय कंपनी व्यवस्थापनाने घेतला.

First published:

Tags: Google, Tech news