नवी दिल्ली, 24 ऑगस्ट : गुगल मॅपमुळे (Google Maps) अनेकदा प्रवास सोपा आणि आरामदायक वाटतो. Google Maps मुळे Routes समजणं आणि रस्ता शोधण्यासाठी अधिक कोणाला विचारवं लागत नाही. एवढंच नाही, तर कोणत्या ठिकाणी, कोणत्या मार्गांवर ट्रॅफिक आहे, याचीही माहिती मिळेत आणि अशावेळी दुसऱ्या मार्गाचा वापर केला जाऊ शकतो. आता येणाऱ्या काही महिन्यात गुगल मॅप्स एक नवं अपडेट आणणार आहे.
गुगल मॅप्स (Google Maps) अतिशय उपयोगी अॅप ठरत असून कंपनी ते अधिक मदतशीर होण्यासाठी प्रयत्न करत आहे. गुगल मॅप्स आधीपासूनच युजरला टोलसह येणारे मार्ग दाखवतो, जेणेकरुन युजर प्रवासाआधीच ठरवू शकेल, त्या टोल मार्गाने प्रवास करायचा की नाही. परंतु आता गुगलने (Google) यात आणखी एक जबदरस्त सुविधा दिली आहे, जी रोड ट्रिपसाठी (Road Trip) जाणाऱ्या लोकांसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी आता गुगल मॅप्समध्ये एक असं सपोर्ट फीचर देणार आहे, जे मार्गात येणाऱ्या टोल्सची किंमतही (Toll) सांगेल. यामुळे प्रवास सुरू करण्याआधीच, प्रवासादरम्यान किती टोल टॅक्स (Toll Tax) भरावा लागेल, याची माहिती मिळेल. कंपनी सध्या या फीचरवर काम करत आहे.
प्रवासाआधी टोलच्या किंमती ड्रायव्हिंग मार्गावर दाखवल्या जातील, त्यामुळे प्रवास करताना माहितीपूर्ण निवड करण्याची परवानगी मिळेल. Google Maps भारतात मार्गावरील टोल ओळखतात आणि दाखवतात. म्हणूनच आता याच आधीच्या फीचरचा वापर करत, त्याला अपडेट करत भारतात युजर्ससाठी टोलची अंदाजे किंमत देण्याबाबत काम सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.