Home /News /technology /

डेटा प्रायव्हसीबाबत Google चं मोठं पाऊल; नेमकं काय केलं, वाचा सविस्तर

डेटा प्रायव्हसीबाबत Google चं मोठं पाऊल; नेमकं काय केलं, वाचा सविस्तर

गुगलने डेटा प्रायव्हसीबाबत (Data Privacy) एक नवी पॉलिसी बनवली आहे. या अतंर्गत, प्ले स्टोरवर (Play Store) असणाऱ्या अ‍ॅपच्या, अ‍ॅप डेव्हलपर्सला युजरचा कोणता डेटा कलेक्ट केला जातो (Data collect) आणि स्टोर (Store) केला जातो, याची माहिती द्यावी लागेल.

पुढे वाचा ...
  नवी दिल्ली, 8 मे : नुकतंच Apple ने आपल्या IOS 14.5 अपडेटमध्ये डेटा प्रायव्हसीबाबत मोठी अपडेट दिली होती. या अपडेटमध्ये, फेसबुकपासून ते इतर कोणत्याही अ‍ॅपला युजरचा डेटा वापर करण्याआधी, युजरची परवानगी घेणं आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं आहे. आता अ‍ॅपलनंतर Google नेही डेटा प्रायव्हसीबाबत मोठं पाऊल उचललं आहे. गुगलने डेटा प्रायव्हसीबाबत (Data Privacy) एक नवी पॉलिसी बनवली आहे. या अतंर्गत, प्ले स्टोरवर (Play Store) असणाऱ्या अ‍ॅपच्या, अ‍ॅप डेव्हलपर्सला युजरचा कोणता डेटा कलेक्ट केला जातो (Data collect) आणि स्टोर (Store) केला जातो, याची माहिती द्यावी लागेल. एका ब्लॉग पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, गुगल या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये अ‍ॅपच्या गोपनीयता धोरणांवर तपशीलवार मार्गदर्शनासह नवीन धोरण आवश्यकता आणि संसाधनं जारी करेल आणि डेव्हलपर्स 2021 च्या चौथ्या तिमाहीमध्ये Google Play कंसोलमधील माहितीची घोषणा करण्यास सुरू करू शकतात. तर युजर्स 2022 च्या पहिल्या तिमाहीमध्ये याचं सेफ्टी सेक्शन पाहू शकतील आणि दुसऱ्या तिमाहीमध्ये नव्या अ‍ॅपचं सबमिशन आणि अ‍ॅप अपडेटमध्ये ही सर्व माहिती दिलेली असेल, असं सांगण्यात आलं आहे.

  (वाचा - कारमधून कचरा नदीत फेकणं पडलं भारी; VIDEO व्हायरल झाल्यानंतर महिलांवर कठोर कारवाई)

  Google Apps - Google च्या व्हाईस प्रेसिडेंट प्रोडक्ट (अँड्रॉईड सिक्योरिटी अँड प्रायव्हसी) सुजेने फ्रे यांनी सांगितलं की, गुगल प्ले सुरक्षित ठेवण्यासाठी डेव्हलपर्ससह मिळून काम करतो, लाखो लोकांना नवनवीन अँड्रॉईड अ‍ॅपचा आनंद देण्यासाठी प्ले स्टोर एक सुरक्षित, विश्वासार्ह स्थान आहे. आगामी काळात गुगल प्ले स्टोरसाठी सेफ्टी सेक्शन येणार असून, अ‍ॅपद्वारे लोकांचा कोणता डेटा कसा आणि कुठे शेअर केला जातो, याबाबत युजर्सला माहिती मिळेल. गुगल प्लेवर असणाऱ्या सर्व अ‍ॅप्ससाठी हे लागू होणार, असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

  (वाचा - तुमच्या भागात लस उपलब्ध आहे की नाही? केवळ 4 स्टेप्सद्वारे अशी मिळवा माहिती)

  कोणत्या प्रकारचा डेटा कलेक्ट केला आहे ते सांगण्याच्या सूचना डेव्हलपर्सला देण्यात आल्या आहेत. स्थान, संपर्क, व्यक्तिगत माहिती जसं नाव, ईमेल, पत्ता, फोटो आणि व्हिडीओ, ऑडिओ फाईल यापैकी कोणत्या गोष्टी डेटा कलेक्टमध्ये सामिल आहेत, हे युजर्सला सांगावं लागेल. तसंच पॉलिसीचं उल्लंघन करताना आढळलेल्या डेव्हलपर्सला त्यांच्या अ‍ॅपमध्ये दुरुस्ती करावी लागेल, असं गुगलने म्हटलं असून या पॉलिसी न स्वीकारणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असंही सांगण्यात आलं आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Android, Apple, Google, Iphone, Tech news

  पुढील बातम्या