Home /News /technology /

कारमधून कचरा नदीत फेकणं पडलं भारी; VIDEO व्हायरल झाल्यानंतर महिलांवर कठोर कारवाई

कारमधून कचरा नदीत फेकणं पडलं भारी; VIDEO व्हायरल झाल्यानंतर महिलांवर कठोर कारवाई

नेत्रावती नदीच्या पुलावर दोन्ही बाजूला उंच रेलिंग लावण्यात आल्या आहेत. तरीही त्या महिला आपल्या कारमधून उतरतात आणि प्लॅस्टिक बॅग पुलावरुन लांब उडवतात. त्या महिलांचा हा व्हिडीओ मागे उभ्या असलेल्या एका कारमधील व्यक्तीने बनवला.

  नवी दिल्ली, 8 मे : पर्यावरण आणि स्वच्छतेप्रती देशातील सर्व राज्यातील सरकार जागरुक आहे. त्याच पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षांपासून स्वच्छ भारत अभियान राबवलं जात आहे. स्वच्छतेबाबत अनेक उपक्रम राबवले जात असताना, दुसरीकडे मात्र काही लोक नद्यांमध्ये कचरा फेकत असल्याचं अनेकदा समोर येतं. असंच एक प्रकरण कर्नाटकच्या मंगळूरुमध्ये (Mangaluru) पाहायला मिळालं. दोन महिला आपल्या लाल रंगाच्या हुंदाई वेरना (hyundai verna) कारमधून उतरतात आणि नदीमध्ये प्लॅस्टिकची बॅग फेकतात. त्यांचा हा कचरा फेकण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर पोलिसांनी या दोन्ही महिलांविरोधात अनेक कलमांतर्गत कारवाई केली आहे. पोलिसांनी ट्विटरवर शेअर केला व्हिडीओ - मंगळूरुचे पोलीस आयुक्त शशि कुमार यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन या घटनेचा व्हिडीओ शेअर केला असून लोकांना असं कोणतंही कृत्य न करण्याबाबत सतर्क केलं आहे. तसंच त्या महिलांविरोधात आयपीसी कलम 269, 270 आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम 51 बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचं, त्यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितलं आहे. या महिलांनी नेत्रावती नदीत (Netravathi River) कचरा टाकल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. नेत्रावती नदीच्या पुलावर दोन्ही बाजूला उंच रेलिंग लावण्यात आल्या आहेत. तरीही त्या महिला आपल्या कारमधून उतरतात आणि प्लॅस्टिक बॅग पुलावरुन लांब उडवतात. त्या महिलांचा हा व्हिडीओ मागे उभ्या असलेल्या एका कारमधील व्यक्तीने बनवला.

  (वाचा - पाठलाग करणं चांगलंच पडलं भारी; गेंड्याने भयंकर रागात असं काही केलं...पाहा VIDEO)

  मंगळूरु पोलीस आयुक्तांनी हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर त्यावर अनेक प्रतिक्रिया येत असून, काही युजर्सनी या महिलांविरोधात कठोर कारवाईची मागणीही केली आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Tech news, Viral videos

  पुढील बातम्या