मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

अँड्रॉईड युजर्सची प्रायव्हसी जपण्यासाठी Google कडून महत्त्वाचं पाऊल; जाणून घ्या काय असणार नवे निर्बंध

अँड्रॉईड युजर्सची प्रायव्हसी जपण्यासाठी Google कडून महत्त्वाचं पाऊल; जाणून घ्या काय असणार नवे निर्बंध

युजर्सची प्रायव्हसी जपण्यासाठी गुगल प्ले-स्टोअरमधल्या अ‍ॅप्लिकेशन्ससाठी गुगलकडून नवे निर्बंध (Restrictions) लागू केले जाणार आहेत. 'एआरएस टेक्निका'मध्ये याबद्दलचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.

युजर्सची प्रायव्हसी जपण्यासाठी गुगल प्ले-स्टोअरमधल्या अ‍ॅप्लिकेशन्ससाठी गुगलकडून नवे निर्बंध (Restrictions) लागू केले जाणार आहेत. 'एआरएस टेक्निका'मध्ये याबद्दलचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.

युजर्सची प्रायव्हसी जपण्यासाठी गुगल प्ले-स्टोअरमधल्या अ‍ॅप्लिकेशन्ससाठी गुगलकडून नवे निर्बंध (Restrictions) लागू केले जाणार आहेत. 'एआरएस टेक्निका'मध्ये याबद्दलचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.

नवी दिल्ली, 7 एप्रिल: युजर्सची प्रायव्हसी जपण्यासाठी गुगल प्ले-स्टोअरमधल्या अ‍ॅप्लिकेशन्ससाठी गुगलकडून नवे निर्बंध (Restrictions) लागू केले जाणार आहेत. 'एआरएस टेक्निका'मध्ये याबद्दलचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. अँड्रॉईड 11 चा भाग असलेल्या "Query_All_Packages" नावाच्या परमिशनबद्दल या अहवालात माहिती देण्यात आली आहे. या परमिशनमुळे तुमच्या अँड्रॉईड डिव्हाईसवर (Android Device) इन्स्टॉल करण्यात आलेल्या अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस दिला जातो आणि त्याबद्दलची माहिती खुली होते.

हा प्रायव्हसीसंदर्भात (Privacy) अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. गुगलनेही त्याचं गांभीर्य ओळखून, "Query_All_Packages" ही परमिशन सेन्सिटिव्ह (Sensitive) अर्थात संवेदनशील असल्याची नोंद गुगलने केली आहे. याचाच अर्थ असा, की इन्स्टॉल केल्या जाणाऱ्या प्रत्येक अ‍ॅपला युजरकडून ही परमिशन मागण्याचा अधिकार असणार नाही. गुगल कंपनीच्या रिव्ह्यू सिस्टीमकडून संबंधित अ‍ॅपचा आढावा घेतला जाताना ती परमिशन आवश्यक असल्याचं गुगलला वाटलं, तरच त्या अ‍ॅपला युजरकडून अशी परमिशन मागण्याचा अधिकार असेल. थोडक्यात, गुगलकडून परवानगी मिळाली, तरच ही परमिशन अ‍ॅप्स युजरकडे मागू शकतात.

अर्थात, याला काही अपवादही आहेत. मुख्यत्वेकरून अर्थव्यवहारांसंदर्भातली अ‍ॅप्स (Financial Apps) हा त्याला अपवाद असेल. कारण अर्थव्यवहारविषयक संस्थांना पडताळणीसाठी, तसंच सुरक्षिततेसाठी या परमिशनची आवश्यकता लागू शकते. त्यामुळे अशा काही अ‍ॅप्सचा तात्पुरत्या स्वरूपात अपवाद केला जाणार असल्याचं गुगलने स्पष्ट केलं आहे.

(वाचा - Google वर या गोष्टी अजिबात शोधू नका; एका Search मुळे खावी लागू शकते जेलची हवा)

या परमिशनचा अवैध वापर कोणकोणता असू शकतो, याची यादी गुगलने केली आहे. संबंधित अटी पूर्ण न करणाऱ्या अ‍ॅप्सना अँड्रॉईड फाईल सिस्टमची माहिती खुली केली जाणार नसल्याचं गुगलने स्पष्ट केलं आहे.

- जेव्हा या परमिशनचा उपयोग संबंधित अ‍ॅपच्या मुख्य हेतूशी निगडित नसेल, तेव्हा त्या अ‍ॅपला अशा परमिशनसाठी परवानगी दिली जाणार नाही.

- पीअर टू पीअर शेअरिंग (P2P) करणाऱ्या अ‍ॅप्समध्ये जर तोच अ‍ॅपचा मुख्य हेतू असेल, तरच अशी परमिशन मागण्याची परवानगी दिली जाईल, अन्यथा नाही.

(वाचा - 5 वर्षाहून कमी वय असलेल्या मुलांसाठी बनवा निळं Aadhaar कार्ड, जाणून घ्या प्रोसेस)

- जे अ‍ॅप्स विक्रीच्या हेतूने डेटा गोळा करण्यासाठी अशी परमिशन मागू इच्छित असतील, त्या अ‍ॅप्सना अशी परमिशन मागण्याची परवानगी दिली जाणार नाही.

- तसंच, जे अ‍ॅप्स त्यांचा हेतू या परमिशनशिवायही पूर्ण करू शकतील, असं गुगलला वाटतं, त्या अ‍ॅप्सनाही अशी परमिशन त्यांच्या युजर्सकडून मागता येणार नाही.

- गुगलकडून उचलल्या गेलेल्या पावलामुळे प्ले-स्टोअरवरची ब्लोटवेअर अ‍ॅप्स (उगाचच जागा व्यापणारी, माहिती गोळा करणारी अ‍ॅप्स) काही करू शकणार नाहीत.

First published:

Tags: Android, Google, Privacy, Security, Tech news