मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Google वर या गोष्टी अजिबात शोधू नका; एका Search मुळे खावी लागू शकते जेलची हवा

Google वर या गोष्टी अजिबात शोधू नका; एका Search मुळे खावी लागू शकते जेलची हवा

र्फिंगपासून शॉपिंगपर्यंत सर्वच गोष्टी गुगलवर सर्च केल्या जातात. परंतु गुगलवर काही गोष्टी सर्च करणं महाग पडू शकतं. एवढंच नाही तर, या चुकीच्या सर्चसाठी तुरुंगवासही होऊ शकतो.

र्फिंगपासून शॉपिंगपर्यंत सर्वच गोष्टी गुगलवर सर्च केल्या जातात. परंतु गुगलवर काही गोष्टी सर्च करणं महाग पडू शकतं. एवढंच नाही तर, या चुकीच्या सर्चसाठी तुरुंगवासही होऊ शकतो.

र्फिंगपासून शॉपिंगपर्यंत सर्वच गोष्टी गुगलवर सर्च केल्या जातात. परंतु गुगलवर काही गोष्टी सर्च करणं महाग पडू शकतं. एवढंच नाही तर, या चुकीच्या सर्चसाठी तुरुंगवासही होऊ शकतो.

नवी दिल्ली, 6 एप्रिल : आजकाल सर्वच जण कोणत्याही गोष्टीसाठी गुगलची मदत घेतात. हा एक असा प्लॅटफॉर्म आहे, ज्याचा वापर प्रत्येक स्मार्टफोन युजर, डेस्कटॉप युजर आणि लॅपटॉप युजरही करतो. सर्फिंगपासून शॉपिंगपर्यंत सर्वच गोष्टी गुगलवर सर्च केल्या जातात. परंतु गुगलवर काही गोष्टी सर्च करणं महाग पडू शकतं. एवढंच नाही तर, या चुकीच्या सर्चसाठी तुरुंगवासही होऊ शकतो.

कस्टमर केअरला सर्च करू नका -

गुगलवर चुकूनही एखाद्या बँकेच्या कस्टमर केअर नंबरला सर्च करू नका. असं करणं मोठी समस्या निर्माण करू शकतं. यामुळे मोठा फ्रॉडही होऊ शकतो. हॅकर्स आजकाल गुगलवर बनावट कस्टमर केअर नंबर आणि बँक वेबसाईट टाकून लोकांना फसवण्याचं काम करतात. त्यामुळे अशा गोष्टी गुगलवर सर्च करणं धोकादायक ठरू शकतं. जर युजरने बनावट साईट किंवा कस्टमर केअर नंबरची मदद घेतली, तर युजर्सचा डेटा हॅकर्सपर्यंत पोहचू शकतो आणि हॅकर्स डेटाचा चुकीचा वापर करू शकतात.

कूपन कोड -

अनेक वेबसाईट्सवर कूपन कोडद्वारे डिस्काउंट दिला जातो. अशात अनेक जण गुगलवर कूपन कोड सर्च करतात. परंतु जाणकारांचं असं म्हणणं आहे की, गुगलवर कूपन कोड सर्च करणं धोकादायक ठरू शकतं आणि याद्वारे युजरची सहजपणे हॅकिंगमध्ये फसवणूक होऊ शकते.

(वाचा - युजर्स स्वत:च करु शकणार फेक न्यूजची ओळख; Google ने शेअर केल्या खास टिप्स)

Email ID -

काही लोक गुगलवर ईमेल आयडीदेखील सर्च करतात, परंतु असं सर्च करणं नुकसानदायक ठरू शकतं. असं केल्याने युजर्सचं अकाउंट लीक होऊ शकतं. तसंच पासवर्डही हॅक होऊ शकतो. यामुळे युजर्स कोणत्याही प्रकारच्या स्कॅममध्ये अडकू शकतात.

औषधं -

तब्येत बरी नसल्यास, स्वत:च डॉक्टर बनू नका. अनेक जण एखाद्या आजारासाठी गुगलवर त्या आजारासंबंधी औषधं सर्च करतात. परंतु अशा सर्चमधून ऑथेंटिक माहिती मिळेलच असं नाही. जर एखादी गोष्ट चुकली तर त्या औषधाचा आरोग्यावर उलटा प्रभाव पडू शकतो. तब्येत आणखी बिघडू शकते. त्यामुळे तब्येत बरी नसल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधं घेणं योग्य आहे.

(वाचा - डेटा यूजबाबत Airtel ने पाठवलं 12 लाखांचं बिल; SMS पाहून ग्राहकाला हार्ट अटॅक)

बॉम्ब बनवण्याची पद्धत -

अनेकदा मस्तीमध्ये युजर्स गुगलवर काहीही सर्च करतात. परंतु जेलची हवा खायची नसल्यास, गुगलवर चुकूनही बॉम्ब बनवण्याची पद्धत सर्च करू नका. केवळ बॉम्बचं नाही, तर बॉम्बसंबंधी कोणतीही माहिती सर्च करणं, थेट जेलमध्ये पोहचवू शकतं. या संबंधी काही गोष्टी सर्च केल्यास, तुमचा आयपी अ‍ॅड्रेस थेट सुरक्षा एजेन्सीपर्यंत पोहचतो. त्यानंतर सुरक्षा एजेन्सीज त्या संबंधीत युजरविरोधात कारवाई करू शकतात आणि यासाठी जेलही होऊ शकते.

First published:

Tags: Google, Tech news