नवी दिल्ली, 28 सप्टेंबर : जर तुम्ही Google Chrome ब्राउजरचा वापर करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. Google ने आपल्या वेब ब्राउजर Chrome च्या जवळपास 2 अब्जाहून अधिक Google Chrome युजर्ससाठी अलर्ट जारी केला आहे. Google Chrome मध्ये हॅकबाबतची माहिती समोर आल्यानंतर ब्राउजर अपडेट करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Google Chrome मध्ये एक झिरो-डे एक्सप्लॉइड मिळाल्यानंतर Google ने स्वत: एका ब्लॉग पोस्टमध्ये हॅकबाबत माहिती दिली. या बगमुळे Google Chrome User चा डेटा हॅक होण्याचा धोका आहे. याद्वारे हॅकर्स युजरचा कोणताही डेटा अॅक्सेस करू शकतात. याआधीही CVE-2021-30563 नावाच्या झिरो-डे एक्सप्लॉइडबाबत इशारा दिण्यात आला होता. आता आणखी एक नवा फ्रॉड समोर आला असून हा धोकादायक असल्याचं सांगण्यात आलं आहे. कंपनीने हा बग सुधारला असल्याचीही माहिती दिली आहे. युजर्स आपलं ब्राउजर अपडेट करुन स्वत:ला सुरक्षित करू शकतात.
Google Chrome अपग्रेड का आवश्यक?
झिरो-डे एक्सप्लॉइड म्हणजेच सायबर क्रिमिनल्स याचा फायदा घेण्यासाठी पूर्णपणे सक्षम होते. महत्त्वपूर्ण बाब म्हणजे सर्व युजर्ससाठी Google Chrome अपग्रेड आवश्यक आहे. लवकरात लवकर हे अपग्रेड करणं फायद्याचं ठरेल. अन्यथा युजरचा डेटा धोक्यात येऊ शकतो.
कसं तपासाल तुमचं Google Chrome Browser सुरक्षित आहे की नाही?
- सर्वात आधी Settings मध्ये जा.
- Help वर क्लिक करा.
- About Google Chrome वर जा. इथे Chrome Version तपासा.
- Google Chrome Version 94.0.4606.61 किंवा याहून अधिकचं वर्जन सुरक्षित आहे.
- Google Chrome Update केल्यानंतर मशीन पुन्हा स्टार्ट करणं अतिशय आवश्यक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.