• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • भारताच्या नव्या IT नियमांसाठी Facebook आणि Google सज्ज! वेबसाईट अपडेट करण्यास सुरुवात

भारताच्या नव्या IT नियमांसाठी Facebook आणि Google सज्ज! वेबसाईट अपडेट करण्यास सुरुवात

सरकारी सुत्रांच्या माहितीनुसार, गुगल, फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपसारख्या बड्या सोशल मीडिया कंपन्यांनी नवीन डिजीटल नियमांनुसार माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे तपशील दिला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 31 मे : गुगल (Google) आणि फेसबुकसारख्या (Facebook) डिजीटल कंपन्यांनी भारताच्या नव्या सोशल मीडिया नियमांनुसार, आपली वेबसाईट अपडेट करण्यास सुरुवात केली आहे. कंपन्यांनी तक्रार अधिकाऱ्याच्या नियुक्तीसह इतर माहिती अपडेट करण्यास सुरुवात केली आहे. सरकारी सुत्रांच्या माहितीनुसार, गुगल, फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपसारख्या बड्या सोशल मीडिया कंपन्यांनी नवीन डिजीटल नियमांनुसार माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे तपशील दिला आहे. परंतु ट्विटर मात्र अद्यापही या नियमांचं पालन करताना दिसत नाही. नव्या नियमानुसार, प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी तक्रार निवारण अधिकारी, नोडल अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नेमणूक करणं आवश्यक आहे. तसंच या अधिकाऱ्यांची नियुक्ती भारतात व्हावी आणि ते इथेच राहावेत असंदेखील सांगण्यात आलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपने यापूर्वीच इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाकडे अनुपालन अहवाल सादर केला आहे. नव्या तक्रार अधिकऱ्यांच्या नियुक्तीबाबतची माहिती या प्लॅटफॉर्मवर अपडेट केली जात आहे. नियमांनुसार, सर्व सोशल मीडिया कंपन्यांना तक्रार निवारण अधिकारी आणि त्यांचा पत्ता याबाबतची माहिती आपल्या वेबसाईट आणि अ‍ॅपवर द्यावी लागेल. तसंच तक्रार करण्याची पद्धतही सांगावी लागेल, जेणेकरुन युजर्स, पीडित व्यक्ती आपली तक्रार नोंदवू शकेल. तक्रार अधिकाऱ्याला 24 तासांच्या आत तक्रार नोंदवल्याबाबतची माहिती द्यावी लागेल. तसंच तक्रार दाखल झाल्यापासून 15 दिवसांच्या आत त्या तक्रारी निकाली काढाव्या लागतील.

  (वाचा - नवीन नियमांचं पालन करण्याचा स्टेटस रिपोर्ट त्वरित सादर करण्याचे केंद्राचे आदेश)

  सरकारी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्विटर नियमांचं पालन करत नाही. कंपनीने मुख्य तक्रार अधिकाऱ्यांची माहिती मंत्रालयाकडे अद्यापही पाठवलेली नाही.

  (वाचा - 'निराधार बोलणं थांबवावं आणि भारतीय कायद्याचं पालन करावं', Twitter च्या वक्तव्यावर केंद्राचं सडेतोड उत्तर)

  गुगल, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप व्यतिरिक्त कू (Koo), सर्चचॅट, टेलिग्राम आणि लिंक्डइन सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनेही मंत्रालयाकडे नवीन नियमांच्या तरतुदींची अंमलबजावणी करण्यासंदर्भात माहिती दिली आहे.
  Published by:Karishma Bhurke
  First published: