मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Mobile चा वापर करताना चुकूनही करू नका या गोष्टी; ठरू शकतं घातक

Mobile चा वापर करताना चुकूनही करू नका या गोष्टी; ठरू शकतं घातक

स्मार्टफोन जितका सोयीचा, सोपा आणि अति गरजेचा झाला आहे. तसा त्याचा चुकीचा वापर केल्याने धोकाही आहे. अनेकदा मोबाईलची बॅटरी फुटून झालेल्या स्फोटात अनेक जण जखमी झाल्याच्या, काहींचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

नवी दिल्ली, 28 मार्च : स्मार्टफोन जितका सोयीचा, सोपा आणि अति गरजेचा झाला आहे. तसा त्याचा चुकीचा वापर केल्याने धोकाही आहे. अनेकदा मोबाईलची बॅटरी फुटून झालेल्या स्फोटात अनेक जण जखमी झाल्याच्या, काहींचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. फोन चार्जिंगला लावला असताना, त्याचा वापर करणं धोकादायक ठरतं. नुकतंच, उत्तर प्रदेशातील मिर्जापूरमध्ये मोबाईलची बॅटरी फुटून एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तो मुलगा हातातच मोबाईलची बॅटरी चार्ज करण्याचा प्रयत्न करत होता.

फोन चार्जिंगला असताना चुकूनही करू नका या गोष्टी -

मोबाईलची बॅटरी चार्ज होत असताना, फोनवर बोलणं, गेम खेळणं आणि गाणी ऐकणं या गोष्टी कधीही करू नयेत. यामुळे फोनसह तुम्ही स्वत:लाही धोक्यात टाकत असता. त्यामुळे फोन चार्ज होत असताना, त्याचा कोणत्याही कामासाठी वापर करू नका.

(वाचा - WhatsApp वापरकर्त्यांनी चुकूनही करू नका या सात चुका, अन्यथा खावी लागेल जेलची हवा)

- फोन कधीही तुमच्या उशीखाली ठेवून झोपू नका.

- फोनमध्ये कोणत्याही लोकल बॅटरीचा वापर करू नका.

(वाचा - फोन पाण्यात पडल्यानंतर या गोष्टी करू नका; वॉटर डॅमेजपासून वाचण्यासाठी Magic Tips)

- स्मार्टफोन कधीही रात्रभर चार्जिंगला लावून तसाच ठेवू नका. ओव्हर चार्जिंगमुळेही बॅटरीमध्ये समस्या निर्माण होतात.

- फोन अतिशय गरम झाला असल्यास, अशा परिस्थितीत त्याचा वापर करू नका.

- फोनच्या सेटिंगमध्ये ज्या App च्या वापरसाठी बॅटरी अधिक वापरली जाते, ते App बंद करा.

First published:

Tags: Mobile, Phone battery, Privacy, Safety, Smartphone, Tech news, Technology