मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

फोन पाण्यात पडल्यानंतर चुकूनही करू नका या गोष्टी; वॉटर डॅमेजपासून वाचण्यासाठी जाणून घ्या Magic Tips

फोन पाण्यात पडल्यानंतर चुकूनही करू नका या गोष्टी; वॉटर डॅमेजपासून वाचण्यासाठी जाणून घ्या Magic Tips

पाण्यात किंवा पूलमध्ये फोन पडल्यास घाबरण्याची किंवा घाई-गडबडीत फोन सुरू करण्याची गरज नाही. काही सोप्या आणि सावधगिरी बाळगून टिप्स वापरल्या तर तुमचा फोन वॉटर डॅमेजपासून वाचवता येऊ शकतो.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 27 मार्च : स्मार्टफोन कसाही आणि कोणताही असला तरी तो प्रत्येकासाठीच महत्त्वाचा आहे. स्मार्टफोनमध्ये केवळ गाणी, फोटोच नसतात तर हल्ली अनेक अकाउंट्सचे पासवर्ड, बँकिंग डिटेल्स फोनमध्ये सेव्ह केलेले असतात. त्यामुळे फोन हरवणं, खराब होणं, पाण्यात पडणं ही बाब अनेकांसाठी चिंतेचा विषय ठरते. पाण्यात किंवा पूलमध्ये फोन पडल्यास घाबरण्याची किंवा घाई-गडबडीत फोन सुरू करण्याची गरज नाही. काही सोप्या आणि सावधगिरी बाळगून टिप्स वापरल्या तर तुमचा फोन वॉटर डॅमेजपासून वाचवता येऊ शकतो.

फोन पाण्यात पडल्यास चुकनही करू नका या गोष्टी -

- फोन पाण्यात पडल्यानंतर लगेचच तो ऑन करू नका.

- फोनच्या कोणत्याही गोष्टीवर टॅप करू नका.

- फोन जोरात हलवू नका.

- फोन ओपन करून, फुंकर मारुन पाणी हटवण्याचा प्रयत्न करू नका. फोनच्या इंटरनल भागात जिथे पाणी पोहचलेलं नसतं, तिथेही फुंकर मारल्याने पाणी पोहचण्याचा धोका असतो.

- फोनला हिट देऊ नका. हेअर ड्रायरचाही वापर करू नका.

(वाचा - Logout करायचं विसरलात? असं जाणून घ्या किती सिस्टममध्ये आजही ओपन आहे तुमचं Gmail)

फोन पाण्यात पडल्यानंतर सर्वात आधी काय कराल -

- पाण्यात पडूनही फोन ऑफ झाला नसेल, तर सर्वात आधी त्याला स्विच ऑफ करा.

- सिम कार्ड आणि मायक्रो एसडी कार्ड स्लॉटमधून बाहेर काढा.

- जर फोनची बॅटरी काढण्यासारखी असेल, तर काढा.

- एखादा कपडा किंवा पेपर टॉवेलचा वापर करुन फोन सुकवा. महत्त्वाची बाब म्हणजे फोनवरचं पाणी सगळीकडे पसरवून पुसू नका. कपडा किंवा पेपरवर पाणी डॅब करण्याचा प्रयत्न करा.

(वाचा - WhatsApp वापरकर्त्यांनी चुकूनही करू नका या सात चुका, अन्यथा खावी लागेल जेलची हवा)

- फोनमध्ये जास्त पाणी गेलं असं वाटत असेल, तर अतिशय सावधपणे वॅक्यूमचा वापर करता येऊ शकतो.

- त्यानंतर फोन तांदळाच्या डब्ब्यात किंवा पिशवीत ठेवा. दोन दिवसांपर्यंत फोन असा ठेवू शकता.

- दोन दिवसांनंतर फोन बाहेर काढल्यावर फोन ऑन करून तो आधीप्रमाणेच सुरू आहे का हे तपासा.

- फोन योग्यरित्या सुरू झाल्यास, फोनमध्ये ऑडिओ-व्हिडीओ सुरू करून पाहा, जेणेकरुन स्पीकर सुरू आहे का हे समजेल.

- फोन ऑन न झाल्यास, फोनची बॅटरी डॅमेज झाल्याची शक्यता असू शकते.

First published:

Tags: Smartphone, Tech news