मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

सावधान! WhatsApp वापरकर्त्यांनी चुकूनही करू नका या सात चुका, अन्यथा खावी लागेल जेलची हवा

सावधान! WhatsApp वापरकर्त्यांनी चुकूनही करू नका या सात चुका, अन्यथा खावी लागेल जेलची हवा

व्हॉट्सअ‍ॅपवर अनेक फोटो, व्हिडीओ, मेसेज एकमेकांना पाठवले जातात. यात अनेकदा अनावधाने अशा काही चूका केल्या जातात, की ज्यामुळए तुम्हाला थेट जेलची हवा खावी लागू शकते. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करताना या गोष्टी नेहमी लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर अनेक फोटो, व्हिडीओ, मेसेज एकमेकांना पाठवले जातात. यात अनेकदा अनावधाने अशा काही चूका केल्या जातात, की ज्यामुळए तुम्हाला थेट जेलची हवा खावी लागू शकते. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करताना या गोष्टी नेहमी लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर अनेक फोटो, व्हिडीओ, मेसेज एकमेकांना पाठवले जातात. यात अनेकदा अनावधाने अशा काही चूका केल्या जातात, की ज्यामुळए तुम्हाला थेट जेलची हवा खावी लागू शकते. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करताना या गोष्टी नेहमी लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 27 मार्च : व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) एक असं इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे, ज्याचा वापर सर्वाधिक लोकांकडून केला जातो. नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे कंपनीला काहीसं नुकसान झालं आहे, परंतु युजर्स बेसवर अधिक फरक पडला नाही. व्हॉट्सअ‍ॅपवर अनेक फोटो, व्हिडीओ, मेसेज एकमेकांना पाठवले जातात. यात अनेकदा अनावधाने अशा काही चूका केल्या जातात, की ज्यामुळए तुम्हाला थेट जेलची हवा खावी लागू शकते. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करताना या गोष्टी नेहमी लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे.

पॉर्न क्लिप -

पॉर्नबाबत अटी अतिशय कठोर आहेत. अशात जर तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर पॉर्न किंवा अश्लिल व्हिडीओ शेअर करताना पकडले गेलात, तर जेलची शिक्षा होऊ शकते. त्याशिवाय पोलीस पॉर्न व्हिडीओ शेअर करणाऱ्यांविरोधात कठोर पावलं उचलू शकतात. एवढंच नाही, तर अशा युजर्सचं व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट कायमसाठी ब्लॉक केलं जाऊ शकतं.

तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर केवळ तुमचाच कंट्रोल असावा. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपची सेटिंग आणि कॉन्टॅक्ट लिस्टची वेळोवेळी तपासणी करणं गरजेचं आहे. कोणीही तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर कोणताही मेसेज करेल, असं होऊ देऊ नका. तसंच अनोळखी व्यक्तीने फालतू मेसेज केल्यास, त्याला ब्लॉक करा.

प्रोफाईल फोटो -

अनेकांना आपल्या व्हॉट्सअ‍ॅप प्रोफाईलमध्ये संपूर्ण माहिती टाकण्याची सवय असते. परंतु सुरक्षेच्या दृष्टीने असं करू नये. शक्यतो ग्रुप फोटोही प्रोफाईलवर ठेऊ नये प्रोफाईल फोटोच्या प्रायव्हसीसाठी तीन पर्याय मिळतात त्या सेटिंगमध्ये बदल करा आणि तुमचा प्रोफाईल फोटो तेच पाहू शकतात, ज्यांना तुम्ही दाखवू इच्छिता, अशी सेटिंग ठेवणं फायद्याचं ठरेल.

टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन -

अनेकजण व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात, परंतु टू फॅक्टर ऑथेंटिकेशनचा वापर करत नाहीत. यामुळे सिम स्वॅप करुन तुमच्या नंबरवरुन दुसऱ्या व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटचा वापर करण्याचा धोका असतो. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप सेटिंग्जमध्ये टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन ऑन करणं महत्त्वाचं ठरतं. यामुळे कोणीही तुमच्या नंबरवरुन व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करू शकणार नाही. एखाद्याने तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपचा चुकीचा वापर केल्यास, पोलीस थेट तुमच्यापर्यंत पोहचू शकतात.

व्हॉट्सअ‍ॅप फिंगरप्रिंट किंवा फेस आयडी लॉक -

व्हॉट्सअ‍ॅपने अ‍ॅप लॉक करण्यासाठी फिंगरप्रिंट आणि फेस आयडी लॉक दिलं आहे. परंतु याचाही उपयोग अनेक युजर्सकडून केला जात नाही. या सेटिंगसह व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅपमध्ये ऑटोमेटिक लॉकचाही पर्याय मिळतो. याची सेटिंग प्रायव्हसी सेटिंगमध्ये मिळेल. लॉक पर्याय सुरक्षित असून कोणीही तुमचं व्हॉट्सअ‍ॅप सहज ओपन करू शकणार नाही, तसंच त्याचा तुमच्या नकळत चुकीचा वापरही होणार नाही.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप -

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये अशीही सुविधा आहे की, तुम्ही तुमच्या मर्जीने कोणत्याही ग्रुपमध्ये अ‍ॅड होऊ शकता. तसंच कोणीही तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये अ‍ॅड करू शकत नाही, अशीही सेटिंग आहे. कोणालाही ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्याची सुविधा दिल्याने ही बाब धोकादायक ठरू शकते. एखाद्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडीओ आला आणि सर्वांनी ग्रुप सोडला तर तुम्ही त्या ग्रुपचे अ‍ॅडमिन होता आणि पोलीस तुमची चौकशी करू शकतात. त्यामुळे ग्रुप अ‍ॅडच्या सेटिंगमध्ये बदल करणं फायद्याचं ठरू शकतं.

ऑटो बॅकअप -

अनेक युजर्सचं व्हॉट्सअ‍ॅप ऑटो बॅकअपवर असतं, जे कधीही असू नये. व्हॉट्सअ‍ॅप केवळ आपल्या प्लॅटफॉर्मवरच युजर्सच्या मेसेजच्या प्रायव्हसीची जबाबदारी घेतं. व्हॉट्सअ‍ॅप गुगल ड्राईव्ह किंवा आयक्लॉउड सारख्या थर्ड पार्टी प्लॅटफॉर्मची जबाबदारी घेत नाही. बॅकअप होताना तुमचं चॅट प्रायव्हेट राहत नाही. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणात तीन वर्ष जुने चॅट अशाच प्रकारे बाहेर काढण्यात आले होते.

First published:

Tags: Whatsapp, WhatsApp chats, WhatsApp features