नवी दिल्ली, 12 मार्च : कोरोना काळात सुरक्षित प्रवासासाठी अनेक लोक पब्लिक ट्रान्सपोर्टच्या जागी प्रायव्हेट वाहनातून प्रवास करणं अधिक पसंत करत आहेत. त्यामुळेच सध्या टू-व्हिलर आणि फोर व्हिलर वाहनांच्या विक्रीमध्ये वाढ झाली आहे. फेस्टिव्ह सीजनमध्ये देशात कार निर्माता कंपन्यांनी मोठी विक्री केली आहे. परंतु अनेक लोक त्यांच्या कमी बजेटमुळे कोणती कार घ्यावी याची निवड करू शकत नाहीत. परंतु काही अशा कार्स आहेत ज्या कमी बजेटमध्ये असून चांगले फीचर्सही देत आहेत. Renault Kwid - फ्रान्सची प्रसिद्ध ऑटो कंपनी रेनॉची सर्वात स्वस्त कार Kwid कमी बजेट असणाऱ्या ग्राहकांमध्ये पसंतीची कार आहे. या कारची दिल्लीत एक्स शोरुम सुरुवातीची किंमत 2 लाख 75 हजार रुपये आहे. तसंच कंपनीने या कारचं डिझाईन अतिशय आकर्षक केलं आहे. रेनॉच्या या कारमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, टचस्क्रिन नेविगेशन सिस्टम आणि ड्रायव्हर साईड एयरबॅगसारखे फीचर्स आहेत.
(वाचा - वाहनांवर स्क्रॅपिंग पॉलिसीचे सर्वसामान्यांना होणार हे 5 मोठे फायदे; पाहा डिटेल्स )
Maruti Suzuki Wagon R - देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीची Wagon R देशातील सर्वात पॉप्युलर कार आहे. कंपनी येणाऱ्या काही दिवसांत Wagon R चं नवं वेरिएंट बाजारात लाँच करणार असल्याची योजना आहे. या कारची दिल्ली एक्स शोरुम सुरुवातीची किंमत 4 लाख 30 हजार रुपये आहे. New Hyundai Santro - न्यू हुंदाई सँट्रो नुकतीच लाँच झाली आहे. ही नवी कार आत-बाहेर संपूर्ण रिडिझाइनसह आली आहे. 1.1 लिटर 4 सिलेंडर इंजिन, इन-हाउस एएमटी ट्रान्समिशनसह ही गाडी असल्याने तिला स्मार्ट ऑटो असंही म्हटलं जातं. याची एक्स शोरुम किंमत 4.19 लाख पासून सुरू होते.
(वाचा - देशातील सर्वात स्वस्त कारवर हजारोंचा डिस्काउंट; जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स )
Tata Tiago - टाटा मोटर्सने टियागो हॅचबॅकच्या नव्या सेगमेंटमध्ये कमी बजेटमध्ये चांगले फीचर्स दिले आहेत. नव्या सेगमेंटमध्ये कंपनीने ड्रायव्हिंग मोड, रिवर्स पार्किंग सेन्सर, एक कूल ग्लव्स बॉक्स आणि 8 स्पीकर ऑडिओ सिस्टम दिली आहे. या कारची दिल्ली एक्स शोरुम किंमती 4 लाख 45 हजारपासून सुरू होते.
(वाचा - इथे होते Royal Enfield Bullet ची पूजा, वाचा अनोख्या मंदिराची कहाणी )
Datsun Go+ - ही कार 2015 मध्ये एक बजेट कार म्हणून लाँच करण्यात आली होती. भारतात 6 लाखांहून कमी सर्वोत्तम कारमध्ये ही एकमेव एमपीवी आहे. कारच्या मागच्या सीट पूर्णपणे फोल्ड करू शकता आणि मोठ्या प्रमाणात 370 लिटर कार्गो स्पेस मिळवता येते. याचे आतील भाग नवीन लेआउट आणि टच स्क्रिन ICE सह रिफ्रेश केले गेले आहेत. याची एक्स शोरुम किंमत 3.86 लाखांपासून सुरू होते.