नवी दिल्ली, 12 मार्च : देशात इतर कार्सच्या तुलनेत हॅचबॅक सेगमेंट कार्सची मागणी नेहमीच सर्वाधिक राहिली आहे. या कारची किंमत, लो मेंटनन्स आणि चांगलं माजलेज हे याचं सर्वात मोठं कारण आहे. त्यामुळे लोक हॅचबॅक कार खरेदी करणं पसंद करतात. अशातच आता देशातील सर्वात स्वस्त हॅचबॅक कारवर 45 हजार रुपयांचा डिस्काउंट मिळतो आहे. त्यामुळे फोर व्हिलर घेण्याचा विचार करत असाल, तर Datsun Redi-Go चा विचार करू शकता. Datsun ने Redi-Go हॅचबॅक कार 6 वेरिएंटमध्ये बाजारात लाँच केली आहे. या कारमध्ये केवळ पेट्रोल पॉवर ट्रिमचा ऑप्शन मिळेल. पण यात दोन इंजिनचा पर्याय मिळेल. यात पहिलं 0.8 लिटर पेट्रोल इंजिन जे 54ps पॉवर आणि 72 Nm चा टॉर्क जनरेट करतं. तर दुसऱ्या इंजिनचा पर्याय 1.0 लिटर पेट्रोल इंजिन मिळेल, जे 69ps पॉवर आणि 91Nm चा टॉर्क जनरेट करतो. या दोन्ही इंजिनसह 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि ऑटोमॅटिक गियरबॉक्सचा ऑप्शन मिळेल.
(वाचा - स्वस्तात कार खरेदीची सुवर्णसंधी; Hyundaiच्या या कार्सवर 1.5 लाखांपर्यंत बंपर सूट )
Datsun Redi-Go फीचर्स - या कारमध्ये कंपनीने LED डे टाईम रनिंग लाईट्स, LED फ्रंट फॉग लँप, डिजिटल टेकोमीटर, 8 इंची टचस्क्रिन इंफोटेन्मेंट सिस्टम देण्यात आली आहे. सेफ्टी फीचर्ससाठी या कारमध्ये ड्रायव्हर एयरबॅग, अॅन्टी लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन (EBD), रियर पार्किंग सेन्सर देण्यात आलं आहे.
(वाचा - जगातील सर्वांत मोठी स्कूटर फॅक्टरी; प्रत्येक दुसऱ्या सेकंदाला तयार होणार एक गाडी )
किंमत आणि ऑफर - या कारच्या बेस वेरिएंटची किंमत 2 लाख 86 हजार रुपये आहे आणि याच्या टॉप वेरिएंटची किंमत 4 लाख 77 हजार रुपये आहे. ज्यावर 45 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळू शकतो. या कारवर 15 हजार रुपये कॅशबॅक, 15 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 15 हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट मिळू शकतो. ही ऑफर 31 मार्चपर्यंत लागू आहे.