• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • इथे होते Royal Enfield Bullet ची पूजा, भक्तांच्या इच्छाही होतात पूर्ण; वाचा अनोख्या मंदिराची कहाणी

इथे होते Royal Enfield Bullet ची पूजा, भक्तांच्या इच्छाही होतात पूर्ण; वाचा अनोख्या मंदिराची कहाणी

या मंदिरात रॉयल एनफिल्ड बुलेट 350 ची (Royal Enfield Bullet 350) पूजा केली जाते. देशभरातील अनेक बाईक रायडर्स आणि इतरही अनेक लोक येथे येऊन सुरक्षा आणि सुख-समृद्धीची कामना करतात.

 • Share this:
  नवी दिल्ली, 11 मार्च : देवाची मंदिरं सगळ्यांनीच पाहिली आहेत. पण बाईकचं मंदिरं कोणी पाहिलं का? असं एक मंदिर आहे जिथे देवाप्रमाणेच, गाडीची पूजा केली जाते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, या गाडीच्या मंदिरात लोकांच्या इच्छाही पूर्ण होतात असं म्हटलं जातं. या मंदिरात रॉयल एनफिल्ड बुलेट 350 ची (Royal Enfield Bullet 350) पूजा केली जाते. देशभरातील अनेक बाईक रायडर्स आणि इतरही अनेक लोक येथे येऊन सुरक्षा आणि सुख-समृद्धीची कामना करतात. राजस्थानातील जोधपूरमध्ये जवळपास 50 किमी दूरवर हे मंदिर आहे. ओम बन्ना धाम (बुलेट बाबा मंदिर) नावाने हे मंदिर प्रचलित आहे. काय आहे मंदिराची कहाणी? राजस्थानमध्ये पाली शहराजवळ चोटिला गावात ठाकूर जोग सिंह राठोड यांचा मुलगा ओम सिंह राठोड यांच्या नावाने हे मंदिर बांधण्यात आलं आहे. जवळपास 30 वर्षांपूर्वी ओम सिंह राठोड यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अपघातानंतर पोलिसांनी ओम सिंह राठोड यांचा मृतदेह आणि बाईक दोन्हीही आपल्या ताब्यात घेतलं. परंतु दुसऱ्या दिवशी बाईक पोलिस स्टेशनमधून गायब होती. ज्यावेळी पोलिसांनी या बाईकची शोधाशोध केली, त्यावेळी ती बाईक अपघात झालेल्या ठिकाणी सापडली. त्यानंतर पुन्हा पोलिसांनी ही बाईक आपल्या ताब्यात घेतली. पण बाईक पोलिस स्टेशनमध्ये आणल्यानंतर रोज अशाप्रकारे गायब होऊन, अपघात झालेल्या ठिकाणीच सापडत होती.

  (वाचा - मॅकेनिकचा 'कार'नामा; कोणतीही पदवी न घेता बनवली पाण्यावर चालणारी Car, VIDEO पाहाच)

  कशी पोहोचायची बाईक अपघातग्रस्त ठिकाणी? बाईक गायब होत असल्याचं लक्षात आल्यानंतर पोलिसांनी बाईक बांधली आणि त्यावर पहारा ठेवण्यात आला. परंतु रात्री असं काही झालं की उपस्थित असलेले सर्वच पोलिस हैराण झाले. बाईक आपोआप स्टार्ट होऊन, स्वत:चं अपघातग्रस्त ठिकाणी पोहचली. त्यानंतर पोलिसांनी बाईक त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवली. ओम बन्ना धाम - राजस्थानमध्ये मुलांना बन्ना असं म्हटलं जातं. बाईक आपोआप अपघात झालेल्या ठिकाणी जात असल्याने, त्यांच्या वडिलांनी अपघातग्रस्त ठिकाणी ओम बन्ना धाम नावाने मंदिराची स्थापना केली. ज्याला बुलेट बाबा मंदिर असंही म्हटलं जातं. त्या ठिकाणावरून, मार्गावरून जाणारे प्रवासी, चांगल्या प्रवासासाठी बुलेट बाबा मंदिरात प्रार्थना करूनच मग पुढे प्रवास करतात.
  Published by:Karishma
  First published: