मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Apple event : जुनी बाटली नवी दारू, अखेर iphone 13 लाँच, काय आहे नवं?

Apple event : जुनी बाटली नवी दारू, अखेर iphone 13 लाँच, काय आहे नवं?

गेल्या अनेक दिवसांपासून बहुप्रतिक्षित असलेला apple चा इव्हेंट मोठ्या थाटात पार पडला.

गेल्या अनेक दिवसांपासून बहुप्रतिक्षित असलेला apple चा इव्हेंट मोठ्या थाटात पार पडला.

गेल्या अनेक दिवसांपासून बहुप्रतिक्षित असलेला apple चा इव्हेंट मोठ्या थाटात पार पडला.

      मुंबई, 14 सप्टेंबर : मोबाईल क्षेत्रातील असलेली दादा कंपनी अर्थात Apple ने आपला नवा कोरा iphone 13 आणि iPhone 13 Pro लाँच केला आहे. या नवा कोऱ्या आयफोनचं डिझाईन हे मागील फोन सारखेच आहे. यात नवीन प्रोसेसर A15 Bionic चिपसेट दिलं आहे. तसंच यावेळी कंपनीने अपडेटेड आयपॅड, वॉच सुद्धा लाँच केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बहुप्रतिक्षित असलेला apple चा इव्हेंट मोठ्या थाटात पार पडला. यावेळी टिम कुक यांनी अॅपल टीव्ही, वॉच, आयपॅड आणि iphone 13 यांची सविस्तर माहिती दिली आहे. KBC 13: आकाशच्या कहाणीतून उलगडलं कोरोना काळातलं पुण्याच्या सोसायटीचं भीषण वास्तव नवी iphone 13 हा जुन्याच अर्थात iphone 12 च्या डिझाईनवर बेस असणार आहे. डिझाईन आणि बॉडीमध्ये कोणताही बदल कऱण्यात आला नाही. यामध्ये नवीन आणि दमदार असे A15 Bionic प्रोसेसर दिले आहे. त्याचबरोबर दोन रिअर कॅमेरे दिले आहे. विशेष म्हणजे, कॅमेऱ्यात नवी फिचर दिले आहे. यात सिनेमॅटिक मोड दिला आहे. तसंच व्हिडीओ रेकॉर्ड करत असताना तुम्ही फोकस कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर तुम्ही डॉल्बीमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करू शकता. तसंच, iPhone 13 Pro सुद्धा लाँच केला आहे. या फोनमध्ये 3 रिअर कॅमेरे दिले आहे. यामध्ये मोशन डिस्पले दिला होता. तर यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट दिला आहे. या फोनमध्ये iPhone 13 Pro मध्ये जास्त ग्राफिक्स असणार आहे. या फोनमध्ये बॅटरी बॅकअॅप चांगल्या प्रकारे दिला आहे. पूर्णक्षमतेनं चार्ज केल्यावर हा फोन एक दिवस वापरू शकता. किंमत iPhone 13 Pro ची किंमत 1099 डॉलर पासून सुरू होईल, याची विक्री 24 सप्टेंबरपासून सुरू होईल. आयफोन-13 ची किंमत 699 डॉलर तर आयफोन 13 प्रोची किंमत 999 डॉलर इतकी असणार आहे. आयफोन-13 आणि आयफोन-13 मिनी सुद्धा लाँच करण्यात आला आहे. आयफोनमध्ये नवीन प्रोसेसर A15 Bionic लाँच केलं आहे. पुण्यात अल्पवयीन पोरं करताय हफ्ता वसुली, दुकानदारावर कोयत्याने हल्ला, LIVE VIDEO अॅपल वॉच सीरीज-7 लाँच केली आहे.  सीरीज-7 मध्ये नवीन बदल केले आहे. यात अनेक कलर्सचे ऑप्शन असणार आहे. यावेळी वॉचमध्ये फिटनेसवर जास्त भर दिला आहे. सीरीज-7 वॉचची किंमत 399 डॉलर इतकी असणार आहे. आजच्या या इव्हेंटमध्ये iPhone 13 Pro, iPhone 13 Pro Max, iPhone 13 Mini, Phone 13 Mini. Apple Watch Series 7, iPad Mini आणि iPad 2021 लाँच करण्यात आले आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या