• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • "किडनीसोबत काय काय विकावं लागणार?" लोकांचा प्रश्न; iPhone 13 लाँचनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

"किडनीसोबत काय काय विकावं लागणार?" लोकांचा प्रश्न; iPhone 13 लाँचनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

सोशल मीडियावर याच्याशी संबंधित मीम्सचा (iPhone 13 memes) अक्षरशः पाऊस सुरू झाला.

 • Share this:
  आयफोन (iPhone) आणि किडनी हे एक समीकरणच झालं आहे. आयफोनच्या महागड्या किंमतीमुळे, तो घेण्यासाठी किडनी विकावी लागणार असल्याचा जोक कोणी तरी केला आणि तो जगभरातील लोकांना आवडला. आता तर आयफोनच्या प्रत्येक मॉडेलच्या लाँचसोबत हा किडनीचा जोक (iphone kidney joke) वेगवेगळ्या अँगलने व्हायरल होत आहे. 14 सप्टेंबरला अॅपलकडून (Apple event) आयफोन 13 लाँच करण्यात आला. याबरोबर सोशल मीडियावर याच्याशी संबंधित मीम्सचा (iPhone 13 memes) अक्षरशः पाऊस सुरू झाला. 14 सप्टेंबरच्या अॅपल इव्हेंटमध्ये आयफोनसोबतच आयपॅड, अॅपल वॉच अशी विविध गॅजेट्स लाँच करण्यात आली; मात्र या इव्हेंटचं खास आकर्षण ठरला आयफोन 13 (iPhone 13 variants) आणि त्याचे इतर व्हॅरिएंट्स. आयफोन 13 मध्ये 5G कनेक्टिव्हिटीसोबत (iPhone 13 features) इतर काही नवीन फीचर्सही देण्यात आली आहेत. तसंच, या फोनचा कॅमेराही (iPhone 13 camera) अतिशय अॅडव्हान्स असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. अॅडव्हान्स फीचर्ससोबतच याची किंमतही तेवढीच तगडी आहे. यामुळेच पुन्हा एकदा आयफोन हा नेटकऱ्यांसाठी मीम्सचा (iPhone 13 memes) विषय ठरत आहे. हे वाचा - आता तुमच्या चष्म्यातूनच काढा फोटो आणि करा कॉल्स; Xiaomi नं लाँच केले स्मार्ट ग्लासेस; वाचा Features एका ट्विटर युझरने म्हटलं आहे, “आयफोन 13ची अनाउन्समेंट झाली आहे, तो घेण्यासाठी आता मला शरीरातल्या कोणत्या अवयवाची गरज नाही ते एकदा बघतो.” यासोबतच, “पेमेंट मेथड – मास्टर कार्ड, व्हिसा कार्ड आणि किडनी” (iPhone 13 memes twitter) अशा आशयाचाही एक मीम शेअर करण्यात आला होता. “आयफोन 13 लाँच झाला आहे, त्यामुळे मग आता आयफोन 12ची किंमत कमी होईल आणि अखेर मला आयफोन 8 (iPhone memes) घेता येईल” असं मजेशीर गणितही एकाने मांडलं होतं. तसंच, आता आपल्याला भरपूर किडनीज् मिळतील म्हणून खूश झालेली रुग्णालयंही दाखवण्याचा कारनामा एका ट्विटर यूझरने केला आहे. आयफोनचं प्रत्येक मॉडेल जवळपास सारखंच (another same iPhone model) असतं, असं म्हणूनही त्यावर कित्येक जण टीका करत असतात. याबाबतही कित्येक मीम्स तयार करण्यात आले आहेत. तसंच, आयफोनचं नवीन मॉडेल (iPhone new model) लाँच झाल्यावर जुन्या व्हॅरिएंट्सचा परफॉर्मन्स खराब होतो अशी एक कॉन्स्पिरसी थिअरी आहे. याचा आधार घेऊनही काहींनी मीम्स शेअर केले आहेत. अॅपलच्या आयफोन 6 नंतर यू-ट्यूबर्समध्ये (iPhone break) एक नवीन ट्रेंड सुरू झाला होता, तो म्हणजे आयफोनची मजबूती तपासणे. तेव्हापासून आयफोनचं नवीन मॉडेल आलं, की कित्येक यू-ट्यूबर्स तो आयफोन जमिनीवर (Youtubers break iPhone) आपटून पाहतात. त्यामुळे आता नेटिझन्स आयफोन 13 कधी आपटून पाहिला जातो याकडे डोळे लावून आहेत.
  First published: