नवी दिल्ली, 26 मार्च : अँड्रॉइड फोन युजर्स (Android Smartphone Users) असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. गुगलने आपल्या प्ले स्टोरवरुन (Google Play Store) एक धोकादायक अॅप हटवलं आहे. हे अॅप युजर्सचा पर्सनल डेटा (Phone Personal Data), फेसबुक डेटा (Facebook Data) चोरी करुन हॅकर्सपर्यंत पोहोचवत होतं. पर्सनल डेटा फोनची माहिती, क्रेडिट कार्ड माहिती, तुम्ही फोनमध्ये काय सर्च केलं, मेसेज अशा गोष्टी चोरी होत होत्या. गुगल प्ले स्टोरवरुन हे अॅप हटवण्यात आलं आहे. परंतु हे हटवलं जाण्याआधी लाखो लोकांनी हे अॅप डाउनलोड केलं होतं. त्यामुळे जर तुम्हीही तुमच्या फोनमध्ये हे अॅप डाउनलोड केलं असेल, तर ते लगेच हटवणं गरजेचं आहे. क्राफ्ट्सआर्ट कार्टून फोटो टूल्स (Craftsart Cartoon Photo Tools) असं त्या अॅपचं नाव असून ते Uninstall करणं आवश्यक आहे. Craftsart Cartoon Photo Tools मध्ये FaceStealer रुपात एक ट्रोजन आहे. ज्याच्या मदतीने युजरसह फ्रॉड किंवा स्कॅम (Online Fraud) होऊ शकतो.
हे वाचा - सावधान! तुमचा स्मार्टफोन हॅक तर झाला नाही ना? अशी ओळखा फोनद्वारे होणारी हेरगिरी
कसा होतो स्कॅम - डाउनलोड केल्यानंतर ज्यावेळी युजर हे अॅप ओपन करतो, त्यावेळी अॅप युजरला फेसबुकशी लॉगइन (Facebook Login) करण्यासाठी सांगतो. यात युजर फेसबुकचा पासवर्ड आणि लॉगइन डिटेल्स टाकतो. त्यानंतर अॅप युजरला एका अनोळखी रशियन सर्वरवर घेऊन जातं. या सर्वरद्वारे युजरचा प्रायवेट डेटा आणि पासवर्ड चोरी केला जातो.
हे वाचा - तुम्ही कोणाशी आणि किती वेळ बोलता Google या Apps द्वारे चोरी करतोय डेटा, रिसर्चमधून मोठा खुलासा
1 लाखहून अधिक इन्स्टॉल - गुगल प्ले स्टोरनुसार, हे अॅप 1 लाखाहून अधिकवेळी इन्स्टॉल करण्यात आलं आहे. अनेकज अद्यापही हे अॅप वापरत आहेत. तुम्हीही हे डाउनलोड केलं असेल, तर ते लगेच अनइस्टॉल करणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुमच्या फेसबुकच्या पासवर्डही बदलणं गरजेचं आहे.