Home /News /technology /

तुम्ही कोणाशी आणि किती वेळ बोलता Google या Apps द्वारे चोरी करतोय डेटा, रिसर्चमधून मोठा खुलासा

तुम्ही कोणाशी आणि किती वेळ बोलता Google या Apps द्वारे चोरी करतोय डेटा, रिसर्चमधून मोठा खुलासा

गुगल Google Dialer and Messages सारख्या Apps वरुन युजर्सच्या परवानगीशिवाय त्यांचा डेटा मिळवत असल्याचा दावा रिसर्चमध्ये करण्यात आला आहे.

    नवी दिल्ली, 23 मार्च : गुगल (Google) अँड्रॉइड युजरच्या (Android User) प्रायव्हसीसंबंधी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचं सांगितलं जातं. तर दुसरीकडे आता एका रिसर्चमध्ये गुगलबाबत एक वेगळाच मोठा दावा करण्यात आला आहे. गुगल Google Dialer and Messages सारख्या Apps वरुन युजर्सच्या परवानगीशिवाय त्यांचा डेटा मिळवत असल्याचा दावा रिसर्चमध्ये करण्यात आला आहे. हे दोन Apps अँड्रॉइड फोनवर प्री-इन्स्टॉल केलेले आहेत. “What Data Do The Google Dialer and Messages Apps on Android Send to Google?” अशा टायटलसह या रिसर्चमध्ये गुगल डेटा मिळवत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या रिसर्चमध्ये हे Apps युजरच्या कोणत्याही परवानगीशिवाय त्यांचा डेटा गुगलला पाठवत असल्याचं म्हटलं आहे. Trinity College मधील Douglas Leith या एका कंप्यूटर सायन्स प्रोफेसरने हे रिसर्च केलं आहे.

    हे वाचा - Chrome युजर्ससाठी सरकारकडून हाय रिस्क अलर्ट, वापरत असाल तर लगेच करा हे महत्त्वाचं काम

    रिपोर्ट्सनुसार, Google युजरचा असा डेटा गोळा करतंय ज्यात SHA26 hash of Messages असा हॅश स्वरुपातील मेसेज, Timestamps, कॉन्टक्ट डिटेल्स, इनकमिंग आणि आउटगोइंग कॉल लॉग्स, कॉलचा कालावधी अशा गोष्टींचा समावेश असल्याचा दावा Douglas Leith यांनी केला आहे. गुगलने डेटा हॅश मेसेज स्वरुपात गोळा केला तरी त्या हॅश कंटेंटमधील मेसेज जाणून घेतला जातो असंही Leith यांनी सांगितलं. त्याशिवाय गुगलने Google Dialer and Messages Apps साठीचा डेटा गोळा करण्यासाठी प्रायव्हसी पॉलिसी देणं अतिशय शांतपणे टाळलं असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. अशाप्रकारे प्रायव्हसी पॉलिसी देणं टाळणं हे नियमांचं उल्लंघन असल्याचंही ते म्हणाले.

    हे वाचा - या 4 स्टेप्सने वेरिफाय करा Aadhaar Card, ऑनलाइन फ्रॉडपासून होईल बचाव

    Douglas Leith यांनी मागील वर्षी हा अभ्यास, हे रिसर्च केलं होतं. त्यानंतर त्यांनी या Apps बाबत आढळलेल्या प्रायव्हसीसंबंधी त्रुटी किंवा इतर बाबींची माहिती Google ला दिली. प्रायव्हसीबाबतच्या अशा त्रुटी टाळण्यासाठी काही महत्त्वाचे बदल करण्याचंही त्यांनी गुगलला सुचवलं होतं. तसंच गुगलला Google Dialer and Messages Apps वरुन डेटा मिळवण्याची कारणं स्पष्ट करण्याचंही त्यांनी सांगितलं होतं. Google ने यावर स्पष्टीकरणही दिलं आहे. या स्पष्टीकरणात गुगलने हॅश मेसेज सिक्वेन्सिंग बग शोधण्यासाठी गोळा केले जात असल्याचं म्हटलं आहे. तर कॉल लॉग्स RCS या मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर पाठवण्यात येणाऱ्या OTP चं ऑटोमेटिक डिटेक्शन सुधारण्यासाठी घेतले जात असल्याचं गुगलने स्पष्ट केलं होतं.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Google, Tech news

    पुढील बातम्या