मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /सावधान! तुमचा स्मार्टफोन हॅक तर झाला नाही ना? अशी ओळखा फोनद्वारे होणारी हेरगिरी

सावधान! तुमचा स्मार्टफोन हॅक तर झाला नाही ना? अशी ओळखा फोनद्वारे होणारी हेरगिरी

Smartphone Tracking: तुमच्या फोनची बॅटरी आणि डेटा झपाट्याने संपतो का? कोणीतरी तुमचा फोन ट्रॅक करत असण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी तुम्ही काही पद्धती अवलंबू शकता.

Smartphone Tracking: तुमच्या फोनची बॅटरी आणि डेटा झपाट्याने संपतो का? कोणीतरी तुमचा फोन ट्रॅक करत असण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी तुम्ही काही पद्धती अवलंबू शकता.

Smartphone Tracking: तुमच्या फोनची बॅटरी आणि डेटा झपाट्याने संपतो का? कोणीतरी तुमचा फोन ट्रॅक करत असण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी तुम्ही काही पद्धती अवलंबू शकता.

    मुंबई, 24 मार्च : सध्याच्या धावपळीच्या काळात मोबाईल (Mobile) हा अन्न, वस्त्र आणि निवारा यांच्या मुलभूत गरजांइतकी महत्वाची वस्तू बनला आहे. मोबाईलमुळे आपलं आयुष्यच डिजिटल (Digital life) झालं आहे. हे डिजिटल आयुष्य सोपं तर आहेच. मात्र, त्याचबरोबर आता काही समस्यादेखील वाढल्या आहेत. सध्याच्या काळात फोटोज असो किंवा महत्वाची कागदपत्रं हे सर्वच आपण आपल्या स्मार्टफोनमध्ये (Smartphones) सेव्ह करतो. त्यामुळे स्मार्टफोन एक प्रकारचं स्मार्ट पॉकेट (Smart pocket) बनला आहे. स्मार्टफोनचे जितके फायदे आहेत, तितकेच तोटेही असतात. स्मार्टफोनमध्ये असलेले अनेक फीचर्स आणि अॅप (Features and App) आपल्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. वेगवेगळ्या अॅपचा वेगवेगळ्या कमांसाठी आणि मनोरंजनासाठी वापर केला जातो. मात्र, बऱ्याचदा आपल्या नकळत काही लोक याचा वापर चुकीच्या कामांसाठी करतात. ते कसे याविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 'आज तक'नं याबाबतची माहिती दिली आहे,

    तुमचा स्मार्टफोन ट्रॅक (Smartphone track) तर होत नाही ना हे जाणून घेण्यासाठी तुम्ही काही ट्रिक्स वापरू शकता. अनेकदा हॅकर्स (Hackers) फोन ट्रॅक करून त्यातील माहिती मिळवतात. फोन ट्रॅक झाल्यानंतर त्यातील मेसेज, कॉल आणि फोटोजही असुरक्षित असतात. तसेच स्मार्टफोन तुमचे लोकेशन (Location) देखील ट्रॅक करतो. आपल्या लोकेशनची माहिती चुकीच्या व्यक्तीकडे गेली तर आपल्याला संकटाचा सामना करावा लाग शकतो.

    कधीकधी फोनमधील कॅमेऱ्याचे आयकॉन आपोआप फ्लॅश होतात. तर काहीवेळा आपोआप मायक्रोफोनचे (microphone) चिन्ह दिसते. तुम्ही मायक्रोफोन किंवा कॅमेरा चालू केला नसेल आणि तरीदेखील त्याचा आयकॉन स्क्रीनवर दिसत असेल तर तुमच्या फोनच्या मायक्रोफोन आणि कॅमेराद्वारे तुमची हेरगिरी (Spying) होत असल्याची शक्यता आहे.

    आता Paytm द्वारे काढता येणार Railway Ticket, पाहा काय आहे सोपी प्रोसेस

    तुमच्या मोबाईलची बॅटरी (Mobile Battery) वेगाने संपत असेल तर त्यामागे अनेक कारणे असू शकतात. फोन ट्रॅक होणे हे देखील त्यातील एक कारण असू शकते. त्यामुळे तुमच्या फोनमधील अॅप्स तपासा. त्यातील कोणतं अॅप जास्त बॅटरी संपवत आहेत हे शोधा. तुम्हाला असं कोणतंही अॅप आढळून आलं नाही तर तुमच्या फोनमधील डेटाचे बॅकअप (Data backup) घ्या आणि त्यानंतर फोन रिसेट (Mobile reset) करा. इतर काही तांत्रिक कारणांमुळे तुमच्या फोनची बॅटरी संपत असेल तर फोन रिसेट केल्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो.

    16इंची व्हील असणारी देशातील पहिली Electric Scooter,पाहा काय आहे किंमत आणि फीचर्स

    फोन रिसेट केल्यानंतरही तुमच्या फोनचा डेटा वेगाने संपत असेल तर तुमच्या फोनमध्ये मालवेअर (Malware) असण्याची शक्यता आहे. मालवेअर तुमच्या फोनवरून इतर उपकरणांवर डेटा पाठवतो. हा डेटा पाठवण्यासाठी त्याला इंटरनेटची गरज असते. तुम्ही अँड्रॉईड (Android Phone) फोन वापरत असाल तर सेटिंग्जमध्ये जाऊन हा डेटा कधी आणि कसा वापरला गेला आहे हे पाहू शकता. तुमच्या फोनमधील डेटा अॅपमुळे संपत नसेल तर त्यात मालवेअर असण्याची शक्यता आहे आणि हे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. यासोबत इतर काही तांत्रिक मार्गाने आपण फोनमध्ये जास्त डेटा वापरणारे काही अॅप आहेत का याचा शोध घेऊ शकतो. तुमच्या स्मार्टफोनमध्ये मालवेअर (Malware in smartphones) असेल तर काही फंक्शन आपोआप वर्क करू शकतात. या ट्रिक्स वापरून तुम्ही तुमचा फोन सुरक्षित ठेवू शकता ते जमलं नाही तर मोबाईलच्या दुकानात जाऊन तो तपासून घ्या.

    First published:

    Tags: Smartphone