मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /तुमच्या फोनमध्ये तुमच्या नकळत कोणी काय पाहिलं? या Code ने मिळेल माहिती

तुमच्या फोनमध्ये तुमच्या नकळत कोणी काय पाहिलं? या Code ने मिळेल माहिती

आपल्या फोनमध्ये कोणी काय काय पाहिलं असेल असा प्रश्न पडतो. पण याची माहिती तुम्ही सहजपणे घेऊ शकता. एका सिक्रेट ट्रिकद्वारे तुम्ही याबाबत जाणून घेऊ शकता.

आपल्या फोनमध्ये कोणी काय काय पाहिलं असेल असा प्रश्न पडतो. पण याची माहिती तुम्ही सहजपणे घेऊ शकता. एका सिक्रेट ट्रिकद्वारे तुम्ही याबाबत जाणून घेऊ शकता.

आपल्या फोनमध्ये कोणी काय काय पाहिलं असेल असा प्रश्न पडतो. पण याची माहिती तुम्ही सहजपणे घेऊ शकता. एका सिक्रेट ट्रिकद्वारे तुम्ही याबाबत जाणून घेऊ शकता.

नवी दिल्ली, 11 मे : स्मार्टफोन (Smartphone) आपल्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा भाग बनला आहे. केवळ फोन करण्यासाठीच नाही, तर अनेक फोटो, व्हिडीओ, फाइल्स, पेमेंट्स, सोशल मीडिया अकाउंट्स, पर्सनल चॅट्स अशा अनेक गोष्टी स्मार्टफोनमध्ये असतात. पर्सनल माहिती इतरांपर्यंत न पोहोचण्यासाठी आपण फोन पासवर्ड, पासकोडने सुरक्षित ठेवतो. अनेकदा एखाद्यावेळी आपला फोन घरातील मेंबर्स, मित्र काही कारणाने घेतात आणि त्याचा वापर करतात.

तसंच काही लोक तर आपला फोन घेऊन स्वत: त्यात अनेक गोष्टी पाहतात. अशावेळी त्यांनी आपल्या फोनमध्ये काय काय पाहिलं असेल असा प्रश्न पडतो. पण याची माहिती तुम्ही सहजपणे घेऊ शकता. एका सिक्रेट ट्रिकद्वारे तुम्ही याबाबत जाणून घेऊ शकता.

हे वाचा - काय सांगता! हातात फोन धरण्याच्या Style वरून उलगडेल तुमचं व्यक्तिमत्व; कसं ते वाचा

एक असा कोड आहे, ज्याद्वारे इतरांनी तुमच्या फोनमध्ये काय पाहिलं हे समजेल. तुमच्या फोनमध्ये तो कोड डायल करा आणि त्यावरुन स्मार्टफोनमध्ये कोणते Apps वापरले गेले, किती वेळ त्याचा वापर केला गेला याची माहिती मिळेल. ही ट्रिक तुम्ही कोणत्याही अँड्रॉइड फोनमध्ये वापरू शकता.

हे वाचा - हे चॅलेंज स्वीकाराच! केवळ 7 दिवस सोशल मीडियापासून राहा दूर; मानसिक आरोग्यामध्ये होईल मोठी सुधारणा

- सर्वात आधी फोनमध्ये ##4636## डायल करावं लागेल.

- हा कोड डायल केल्यानंतर फोनमध्ये एक सेटिंग ओपन होईल.

- इथे तीन ऑप्शन Phone Information, Usage Statics, आणि Wifi Information दिसतील.

- यापैकी दुसऱ्या ऑप्शनवर Usage Statics वर टॅप करावं लागेल.

- या लिस्टमध्ये मागील काही तासांत वापरल्या गेलेल्या Apps ची नावं, वापर केलेला वेळ आणि ड्युरेशन समजेल.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच एका अभ्यासात असं समोर आलं होतं, की एक व्यक्ती दिवसाला तब्बल सहा तास मोबाइलवर असते. यातले दोन ते अडीच तास आपण सोशल मीडियावर व्यग्र असतो. यामुळे माणसांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. सोशल मीडिया (Social Media side effects) आणि इंटरनेटच्या अति वापरामुळे डिप्रेशन (Depression), अँक्झायटी (Anxiety) आणि मूड स्विंग्ज (Mood Swings) अशा आजारांचे प्रमाण वाढलं आहे. यामुळे आपल्या सर्वांनाच वेळोवेळी सोशल मीडियापासून ब्रेक घेणं गरजेचं आहे.

First published:

Tags: Android, Smartphone, Tech news