Home /News /news /

हे चॅलेंज स्वीकाराच! केवळ 7 दिवस सोशल मीडियापासून राहा दूर; मानसिक आरोग्यामध्ये होईल मोठी सुधारणा

हे चॅलेंज स्वीकाराच! केवळ 7 दिवस सोशल मीडियापासून राहा दूर; मानसिक आरोग्यामध्ये होईल मोठी सुधारणा

7 दिवस सोशल मीडियापासून राहा दूर

7 दिवस सोशल मीडियापासून राहा दूर

आपण सोशल मीडियापासून छोटासा ब्रेक (Social Media Break) घेतला, तरी आपल्या मानसिक आरोग्यात बरीच सुधारणा दिसून येते.

  मुंबई, 10 मे:   काही दिवसांपूर्वीच एका अभ्यासात असं समोर आलं होतं, की एक व्यक्ती दिवसाला तब्बल सहा तास मोबाइलवर असते. यातले दोन ते अडीच तास आपण सोशल मीडियावर व्यग्र असतो. यामुळे माणसांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. सोशल मीडिया (Social Media side effects) आणि इंटरनेटच्या अति वापरामुळे डिप्रेशन (Depression), अँक्झायटी (Anxiety) आणि मूड स्विंग्ज (Mood Swings) अशा आजारांचे प्रमाण वाढलं आहे. यामुळे आपल्या सर्वांनाच वेळोवेळी सोशल मीडियापासून ब्रेक घेणं गरजेचं आहे. ब्रिटनच्या बाथ विद्यापीठात (University of Bath) या विषयावर नुकतंच एक संशोधन करण्यात आलं. या रिसर्चच्या प्रमुख डॉक्टर जेफ लँबर्ट यांनी सांगितलं, की आपल्या आयुष्यात डिप्रेशन आणि चिंता वाढण्याचं मोठं कारण हे सोशल मीडियाच (Social Media and Depression) होत आहे. त्यामुळे आपण सोशल मीडियापासून छोटासा ब्रेक (Social Media Break) घेतला, तरी आपल्या मानसिक आरोग्यात बरीच सुधारणा दिसून येते. फोनमध्ये नेटवर्कची समस्या येतेय? या पद्धतीने नेटवर्क नसतानाही करता येणार Calling
  डिजिटल डिटॉक्स सर्वांच्याच फायद्याचं या रिसर्चमध्ये 18 ते 72 वर्षं वयोगटातल्या एकूण 154 व्यक्तींचा समावेश करण्यात आला होता. या व्यक्तींचे दोन गट करण्यात आले. यातल्या एका गटाला फेसबुक, इन्स्टाग्राम, टिकटॉक आणि ट्विटर अशा प्रकारच्या सर्व सोशल मीडिया साइट्सपासून दूर ठेवण्यात आलं. दुसऱ्या गटातल्या व्यक्तींना दररोज 8 तास सोशल मीडिया सर्फिंग करण्यास सांगण्यात आलं. एका आठवड्यानंतर त्यांचा फीडबॅक घेण्यात आला. यामध्ये सोशल मीडिया न वापरणाऱ्या व्यक्ती जास्त आशावादी आणि मानसिकरित्या निरोगी असल्याचं दिसून आलं. त्यामुळे हे डिजिटल डिटॉक्स (Digital Detox) सर्वांच्याच फायद्याचं असल्याचं स्पष्ट झालं.
  डिप्रेशन आणि चिंतादेखील कमी एक आठवड्यानंतर या व्यक्तींना आशावाद आणि लहान-लहान आनंददायी गोष्टींबाबत प्रश्न विचारण्यात आले. जनरल अँक्झायटी डिसऑर्डर स्केलवर (General Anxiety Disorder scale) या व्यक्तींचे आकडे 46-55.93 या दरम्यान दिसून आले. हा चांगला स्कोअर आहे. तसंच त्यांचं डिप्रेशनही 7.46 वरून 4.84 पर्यंत खाली आलं. अँक्झायटी स्तरही 6.92 वरून 5.94 पर्यंत खाली आला. बहुतांश व्यक्तींनी या प्रयोगामुळे आपल्याला सकारात्मक परिणाम जाणवल्याचं सांगितलं. डेली मेलमध्ये याबाबतचं वृत्त प्रसिद्ध करण्यात आलं होतं. जगातली सगळ्यात छोटी कार, एक लिटर पेट्रोलमध्ये चालते इतके किलोमीटर
  एकूणच, सोशल मीडियावर कितीही मनोरंजन होत असलं, तरी त्याच्या अतिवापरामुळे आपल्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे वेळोवेळी डिजिटल डिटॉक्स करणं, म्हणजेच सोशल मीडियापासून ब्रेक (Take a break from social media) घेणं फायद्याचं ठरू शकतं हे आकडेवारीनेही स्पष्ट झालं आहे. त्यामुळेच तुम्हीदेखील अशा प्रकारचा प्रयोग करून स्वतःमधले बदल ओळखू शकता.
  First published:

  Tags: Social media, Technology

  पुढील बातम्या