Home /News /lifestyle /

काय सांगता! हातात फोन धरण्याच्या Style वरून उलगडेल तुमचं व्यक्तिमत्व; कसं ते वाचा

काय सांगता! हातात फोन धरण्याच्या Style वरून उलगडेल तुमचं व्यक्तिमत्व; कसं ते वाचा

फोन धरण्याच्या style वरून उलगडेल तुमचं व्यक्तिमत्व

फोन धरण्याच्या style वरून उलगडेल तुमचं व्यक्तिमत्व

मोबाइलही (Mobile) आता तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडायला मदत करू शकतो. मोबाइल हातात धरण्याच्या विविध पद्धतींनुसार तुम्ही कसे आहात, हे ओळखता येतं.

    मुंबई, 11 मे:   स्वतःबद्दल जाणून घेण्याची प्रत्येकाला उत्सुकता असते. आपलं व्यक्तिमत्त्व (Personality Test) इतर लोकांना कसं वाटतंय किंवा त्यांना ओळखता येतं आहे का यात अनेकांना रस असतो. स्वतःच्या राशीचं भविष्य असेल, वाढदिवसाची तारीख किंवा महिना यावरूनही व्यक्तिमत्त्व कसं असेल हे जाणून घ्यायला अनेकांना आवडतं. सध्याच्या काळात आपली गरज झालेला मोबाइलही (Mobile) आता तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडायला मदत करू शकतो. मोबाइल हातात धरण्याच्या विविध पद्धतींनुसार तुम्ही कसे आहात, हे ओळखता येतं. माणसांच्या फोन धरण्याच्या पद्धतीनुसार त्यांचं व्यक्तिमत्त्व कसं असेल, हे ठरवता येतं, असा दावा beautyaal ने केल्याचं वृत्त 'द सन' ने दिलं आहे. चित्रांच्या, फोटोंच्या माध्यमातून पर्सनॅलिटी टेस्ट घेतल्याचं आपण पाहतो; पण फोन धरण्याची पद्धतही आता आपल्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडून दाखवते, असा त्यांचा दावा आहे. हे चॅलेंज स्वीकाराच! केवळ 7 दिवस सोशल मीडियापासून राहा दूर; मानसिक आरोग्यामध्ये होईल मोठी सुधारणा व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पाडणाऱ्या गोष्टी आपल्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पाडणाऱ्या अनेक गोष्टी असतात. तसंच काही गोष्टींमुळे आपलं व्यक्तिमत्त्व वेगवेगळ्या प्रकारे विकसित होतं. एखादी व्यक्ती कसं बोलते, चालते, खाण्यापिण्याच्या सवयी (Eating habits), सही करण्याच्या पद्धती (Signature) यावरून त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व कसं असेल, याची चाचपणी करता येते. आता तर मोबाइल धरण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीही तुमचं व्यक्तिमत्त्व कसं असेल, हे ओळखायला मदत करू शकतात. मोबाइल धरण्याच्या वेगवेगळ्या पद्धती व त्यानुसार व्यक्तिमत्त्वाचा आढावा याबद्दल जाणून घेऊ या. एकाच हातात फोन धरणं अनेक जण आपला फोन एकाच हातात धरतात व अंगठ्यानं स्क्रोल करतात. तुम्हीही असंच करत असाल, तर तुम्ही तणावरहित, खूश व्यक्ती असून तुमच्यात आत्मविश्वास (Self Confidence) असेल. आयुष्यात जे मिळेल ते सहज स्वीकारणारी व्यक्ती आहात. नव्या गोष्टी करायला तुम्ही घाबरत नाही, तसंच स्वतःच्या कम्फर्ट झोनबाहेर जाऊनही तुम्ही काही गोष्टी करू शकता. एका हातानं फोन धरून दुसऱ्या हातानं स्क्रोल करणं एका हातानं फोन धरून दुसऱ्या हाताच्या अंगठ्यानं स्क्रोल करणाऱ्या व्यक्ती बुद्धिमान आणि सगळ्या गोष्टी पारखून घेणाऱ्या असतात. ते प्रत्येक गोष्टीबाबत जागरूक असतात. इतरांना व्यवस्थित ओळखतात. डेटिंगसाठी योग्य पार्टनरही या व्यक्ती ओळखू शकतात. दोन्ही हातांचे अंगठे स्क्रीनवर ठेवणं दोन्ही हातांनी फोन धरून दोन्ही अंगठ्यांनी स्क्रोल करणाऱ्या व्यक्ती आव्हानांचा खंबीरपणे सामना करून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. कठीण परिस्थितीत तग धरून राहणं जाणतात. गोष्टी आहे तशा स्वीकारणं यांना जमतं. या व्यक्ती उत्साही असतात. त्यांना पार्टीज आवडतात. फोनमध्ये नेटवर्कची समस्या येतेय? या पद्धतीने नेटवर्क नसतानाही करता येणार Calling एका हातानं फोन धरून दुसऱ्या हाताच्या तर्जनीनं (Index Finger) स्क्रोल करणं सामान्यतः अशा पद्धतीनं फोन (Smart Phones) धरणारे फार जण नसतात. जे अशा पद्धतीनं फोन धरतात, त्यांचे विचार फार मौल्यवान असतात. त्यांना अनेकविध कल्पना सुचतात. कोणत्याही करिअरमध्ये यांना यश मिळू शकतं. हे बहिर्मुखी अर्थात बोलून व्यक्त होणारे असतात; मात्र त्यांना एकांतही आवडतो. खासगी आयुष्यात या व्यक्ती थोड्या लाजाळू असतात. एकच फोन वेगवेगळ्या पद्धतींनी धरला, तर त्यातून आपल्या व्यक्तिमत्त्वाचे किती तरी पैलू समोर येतात, हे यातून आपल्याला जाणवतं. आता तुमचा मोबाइल जगातल्या इतर गोष्टीच नाही तर तुमचं व्यक्तिमत्त्वही तुमच्यासमोर उलगडून दाखवेल, हे पटलं असेल ना!
    First published:

    Tags: Lifestyle, Technology

    पुढील बातम्या