नवी दिल्ली, 25 मे : जर तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोन युजर असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे . अँड्रॉइड स्मार्टफोन युजर्ससाठी एक धोक्याची घंटा आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास युजरच्या स्मार्टफोनमधील केवळ स्टोर डेटा चोरी होणार नाही तर युजरची हेरगिरीही केली जाऊ शकते.
Google ने अँड्रॉइड युजर्ससाठी एक अलर्ट जारी केला आहे. एका स्पायवेअरद्वारे सायबर क्रिमिनल्स स्मार्टफोन युजर्सची हेरगिरी करुन त्यांचा डेटा चोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. गुगलच्या थ्रेट अॅनालिसिस ग्रुपने एका स्पायवेअरची ओळख केली आहे. या स्पायवेअरला PREDATOR नाव देण्यात आलं आहे. गुगलने हा स्पायवेअर अतिशय धोकादायक असल्याचं सांगितलं असून यामुळे युजरला मोठा धोका असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
स्पायवेअर कसं काम करतो -
मनीकंट्रोल डॉट कॉमच्या एका रिपोर्टनुसार, स्पायवेअर PREDATOR एका ईमेलद्वारे युजरला पाठवला जातो, अशी माहिती गुगलने दिली आहे. हा स्पायवेअर एका कमर्शियल इंटिटी कंपनी Cytrox ने बनवला आहे. कंपनीचं हेडक्वार्टर मेसिडोनियामध्ये (Macedonia) आहे. यात एक वन-टाइम लिंक आहे, ज्याला URL शॉर्टनरद्वारे इम्बेड केलं गेलं आहे. ज्यावेळी युजर या लिंकवर क्लिक करतो, त्यावेळी त्याला एका डोमेनवर रिडायरेक्ट केलं जातं. हे ALIEN नावाने स्पायवेअर युजरच्या स्मार्टफोनमध्ये डिलीव्हर करतो.
रिसर्चर्सने हा स्पायवेअर मल्टीपल प्रिविलेज्ड प्रोसेसरमध्ये असतो. या स्पायवेअरने युजरच्या डिव्हाइसमध्ये एन्ट्री केल्यानंतर अनेक प्रकारच्या IPC कमांड देऊ शकतो. हा ऑडिओ रेकॉर्ड करू शकतो आणि ते बाहेर पाठवूही शकतो. इतकंच नाही, तर हा स्पायवेअर CA सर्टिफिकेट जोडणं आणि Apps हाइडही करू शकतो.
अलर्ट राहा -
सायबर क्रिमिनल्स डेटा चोरी करण्यासाठीचा सतत प्रयत्न करत असतात. त्यामुळे सतत सतर्क राहणं गरजेचं आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीने पाठवलेल्या लिंकवर क्लिक करू नये. तसंच तुम्ही फोनमध्ये कोणतंही App डाउनलोड करत असाल, ते सुरक्षित प्लॅटफॉर्मवरुनच डाउनलोड करा. कोणत्याही वेबसाइटवरुन कोणतंही App डाउनलोड करू नका.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Android, Google, Malware, Smartphone, Tech news