मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Smartphone Alert! हे Apps तुमच्या फोनमध्ये असल्यास लगेच करा डिलीट, बसेल मोठा फटका

Smartphone Alert! हे Apps तुमच्या फोनमध्ये असल्यास लगेच करा डिलीट, बसेल मोठा फटका

सायबर सुरक्षा कंपनी ट्रेंड मायक्रोच्या लेटेस्ट रिपोर्टमध्ये प्ले स्टोरवर 200 हून अधिक अँड्रॉइड App मध्ये फेसस्टीलर नावाचं एक स्पायवेअर आढळलं आहे, जे केवळ युजर्सचा वैयक्तिक डेटाच नाही, तर फेसबुक पासवर्ड आणि इतर काही डिटेल्सचीही चोरी करतं.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 24 मे : स्मार्टफोन जवळपास सर्वांच्याच आयुष्याचा महत्त्वाचा भाग झाला आहे. फोनवरच अनेक Apps द्वारे बँकेची कामं केली जातात. अनेक Apps द्वारे शॉपिंगही केली जाते. असे अनेक Apps आहेत जे वेगवेगळ्या कामांसाठी वापरले जातात. परंतु या Apps बाबत एक हैराण करणारा रिपोर्ट समोर आला आहे. धोकादायक स्पायवेअर वेळोवेळी Google Play Store वर येतो. सायबर सुरक्षा कंपनी ट्रेंड मायक्रोच्या लेटेस्ट रिपोर्टमध्ये प्ले स्टोरवर 200 हून अधिक अँड्रॉइड App मध्ये फेसस्टीलर नावाचं एक स्पायवेअर आढळलं आहे, जे केवळ युजर्सचा वैयक्तिक डेटाच नाही, तर फेसबुक पासवर्ड आणि इतर काही डिटेल्सचीही चोरी करतं.

फेसस्टीलर स्पायवेअरसह 200 हून अधिक App शिवाय ट्रेंड मायक्रोला 40 हून अधिक नकली क्रिप्टोक्यूरेन्सी मायनर App आढळले आहेत, जे क्रिप्टो पैसे चोरी करण्यासाठी आणि युजर्सच्या परवानगीशिवाय संवेदनशील माहिती एकत्र करण्याचा प्रयत्न करत होते.

सर्व धोकादायक Apps मध्ये हजारो इन्स्टॉलेशन आहेत. रिपोर्टनुसार, Google ने स्पायवेअरवर लक्ष दिलं आहे आणि फेसस्टीलर Apps हटवले आहेत. ज्या युजर्सच्या फोनमध्ये असे धोकादायक Apps असतील त्यांनी ते लगेच डिलीट करणं गरजेचं आहे, जेणेकरुन ते युजर्सची वैयक्तिक माहिती मिळवू शकणार नाहीत.

सर्वात धोकादायक Apps -

बिजनेस मेटा मॅनेजर (Business Meta Manager)

पॅनोरमा कॅमेरा (Panorama Camera)

एन्जॉय फोटो एडिटर (Enjoy Photo Editor)

फोटो गेमिंग पजल (Photo Gaming Puzzle)

स्वॅम फोटो (Swam Photo)

डेली फिटनेस ओएल (Daily Fitness OL)

क्रिप्टोमाइनिंग फार्म योर ओन कॉइन (Crypto mining Farm Your own Coin)

हे वाचा - 15 लाखहून अधिक Apps हटवले जाणार? Apple आणि Google चा इशारा, पाहा काय आहे कारण

कोणतंही App डाउनलोड करताना ते अधिकृत आहे की नाही याची माहिती घ्या. तसंच एखाद्या App वर तुमचे बँकिंग, आधार-पॅन कार्डसारखे डिटेल्स मागितले असल्यास ते देऊ नका. कोणीही पाठवलेल्या लिंकवर क्लिक करुन App डाउनलोड करू नका.

First published:

Tags: Apps, Malware, Smartphone, Tech news