नवी दिल्ली, 5 मे : अँड्रॉईडच्या (Android) डेटा सिक्योरिटीबाबत अनेकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. आता पुन्हा एकदा Android च्या डेटा सिक्योरिटीवर एका नव्या अभ्यासातून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. गुगलचा अँड्रॉईड प्लॅटफॉर्म, iOS हून आठ पट अधिक डेटा स्कूल अॅप्सकडून, अतिशय धोकादायक असणाऱ्या थर्ड पार्टीला पाठवत असल्याचं सांगण्यात आलं आहे.
हा अभ्यास Me2B Alliance कडून करण्यात आला आहे. या अभ्यासामध्ये ऑर्गेनायझेशनने 38 शाळांच्या 73 मोबाईल अॅप्सला सामिल केलं होतं. यात अमेरिकेतील 14 राज्यांचा समावेश करण्यात आला. तसंच जवळपास 5 लाख लोकांना यात सामिल करण्यात आलं. अशा लोकांचा यात समावेश करण्यात आला होता, जे हे अॅप्स वापरतात. अभ्यासासाठी विद्यार्थी, फॅमिली, एज्युकेटर यांना सामिल करुन घेण्यात आलं होतं.
गुगल 49 टक्के डेटा ट्रॅफिक रिसिव्ह करतं. तर फेसबुक 14 टक्के डेटा रिसिव्ह करतो. याउलट अँड्रॉईड अॅप्स धोकादायक थर्ड पार्टीसाठी 91 टक्के विद्यार्थ्यांचा डेटा शेअर करतो. तर iOS चे केवळ 26 टक्के अॅप्स डेटा शेअर करतात.
अँड्रॉईड धोकादायक हाय रिस्क थर्ड पार्टीसह 20 टक्के डेटा शेअर करतो. तर iOS 2.6 टक्के डेटा शेअर करतो. याचाच अर्थ अँड्रॉईड अॅप्स आयओएसच्या तुलनेत जवळपास 8 टक्के अधिक आहेत. रिपोर्टनुसार, डेटा जो थर्ड पार्टीला शेअर केला जातो, त्यात Unique identidiers ही असतो. यामुळे युजरचं प्रोफाईल बनवण्यास मदत मिळते.
थर्ड पार्टी प्लॅटफॉर्म्स यामुळेच 13 वर्षाहून कमी वय असलेल्या मुलांचंही प्रोफाईल बनवतात. तसंच विद्यार्थ्यांचा डेटा थर्ड पार्टी अॅप्ससह, अॅप ओपन होताच, शेअर केला जाऊ लागतो. विद्यार्थ्याने जरी साईन-इन केलं नाही, तरीही केवळ अॅप ओपन करताच, त्यांचा डेटा शेअर केला जात असल्याचा दावा या अभ्यासातून केला गेला आहे.
गुगल आणि अॅपलने ते कोणत्या थर्ड पार्टीसह डेटा शेअर करतात, हे स्पष्ट करावं असं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. अनेकांना आपला डेटा कोणासोबत शेअर केला जातो, याबाबत कोणतीही माहिती नसल्याचंही या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.