मुंबई, 26 फेब्रुवारी: तुम्ही जर नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. सध्या सीझन सुरू असल्याने ई-कॉमर्स वेबसाईट अॅमेझॉनवर (Amazon offer) एका पाठोपाठ एक सेल येत आहेत. आता 25 फेब्रुवारीपासून ते 28 फेब्रुवारीपर्यंत अॅमेझॉनवर फॅब फोन्स फेस्ट (Amazon Fab Phones Fest) नावाचा सेल सुरू आहे. या सेलमध्ये मोबाईल, टॅबलेट, टीव्ही आणि अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर काही खास ऑफर्स मिळणार आहेत. याआधी जर तुम्ही अॅमेझॉनवरील सेलचा फायदा घेऊ शकला नसाल, तर तुमच्यासाठी ही खास संधी आहे. या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन सवलतीच्या दरात विकले जात आहेत. तर अॅमेझॉनच्या या ऑफरमध्ये तुम्ही दमदार स्मार्टफोन अगदी कमी किमतीत विकत घेऊ शकता. हे स्मार्टफोन कोणते आहे, त्यांची वैशिष्ट्ये काय आहे, हे जाणून घेऊया.
Amazon वर OPPO A74 5G स्मार्टफोन खूपच कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. बंपर डिस्काउंटनंतर हा फोन 20,990 रुपयांना नाही तर 16,990 रुपयांना उपलब्ध होईल. तसेच जर तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळाला तर 15,000 रुपये वाचवू शकाल. तसेच बँकेच्या ऑफरचा फायदा घेत HDFC बँकेचे कार्ड वापरून 1000 रुपयांची बचत करू शकलात तर हा फोन तुम्ही फक्त 990 रुपयांमध्ये घरी घेऊन जाऊ शकता.
हे वाचा-गुगल क्रोममध्ये ‘Enhanced Safe Browsing Mode’ कसा ऑन करायचा? जाणून घ्या सविस्तर
सॅमसंगचा नवीन सॅमसंग गॅलेक्सी F42 5G स्मार्टफोन हा दमदार फोन आहे. या सेलमध्ये तुम्ही हा फोन 23,999 रुपयांऐवजी 17,879 रुपयांना खरेदी करू शकता. तसेच एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळाल्यास F42 5G तुम्हाला 15 हजार रुपयांची सूट मिळेल. याशिवाय, HDFC बँक कार्ड पेमेंटवर 1000 रुपयांची सूट मिळेल. असं केल्यास तुम्ही हा फोन फक्त 1,879 रुपयांत खरेदी करू शकता.
अॅमेझॉनवर फॅब फोन्स फेस्ट सेलमध्ये Redmi Note 11T 5G वर जबरदस्त ऑफर मिळत आहे. दमदार कॅमेरा असलेला हा स्मार्टफोन 17,499 रुपयांना तुम्ही खरेदी करू शकता. या फोनची मूळ किंमत 20,999 रुपये आहे. सध्या या सेलमध्ये दमदार फीचर्ससह येणाऱ्या Redmi Note 11T 5G ला तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता. HDFC बँक कार्ड वापरून मिळणारी 1,000 ची सवलत आणि एक्सचेंज ऑफरचा पूर्ण लाभ मिळाल्यास 15,000 ची सूट मिळेल त्यामुळे तुम्हाला या फोनची किंमत 1,499 रुपये पडेल.
हे वाचा-Smartphone द्वारे काही सेकंदात चोरी झाले 64 लाख रुपये,वाचा कसा झाला Online Fraud
नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा विचार असेल तर, iQOO Z3 5G सध्या तुम्हाला 17,990 रुपयांपर्यंतच्या ऑफरसह खरेदी करता येईल. हा फोन मार्केटमध्ये 22,977 रुपयांना मिळतो. फोन एक्स्चेंज केल्यास तुम्हाला त्यावर 15 हजार रुपयांपर्यंतची ऑफर दिली जाईल. तसेच कूपन डिस्काउंटने 1 हजाराची सूट मिळेल. दोन्ही ऑफर मिळून हा फोन तुम्हाला 1,990 रुपयांना पडेल. यासोबतच जर तुम्ही HDFC बँकेचे कार्ड वापरून पेमेंट केले तर आणखी 1 हजार रुपयांची सूट मिळेल. म्हणजेच तुम्ही हा फोन 990 रुपयांना खरेदी करू शकाल.
रियलमी Narzo 30 5G हा स्मार्टफोन दमदार फीचर्ससह येतो. सेलमध्ये ऑफरचा लाभ घेतला तर तुम्ही हा फोन 17,999 रुपयांऐवजी 16,999 रुपयांना खरेदी करू शकता. सोबतच एक्सचेंज ऑफरचा पूर्ण फायदा घेतल्यावर तुम्हाला आणखी 15 हजारांची सूट मिळेल. तसेच 1,500 रुपयांचे कूपन डिस्काउंटही दिले जात आहे. म्हणजेच तुम्ही हा स्मार्टफोन फक्त 499 रुपयांमध्ये घरी नेऊ शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amazon, Oppo smartphone, Realme, Redmi, Samsung, Samsung galaxy, Smartphone, Tech news