Home /News /technology /

Smartphone द्वारे काही सेकंदात चोरी झाले 64 लाख रुपये, वाचा कसा झाला Online Fraud

Smartphone द्वारे काही सेकंदात चोरी झाले 64 लाख रुपये, वाचा कसा झाला Online Fraud

एका व्यवसायिकाने आपल्या स्मार्टफोनवर दोन दिवस सतत काहीतरी विचित्र अॅक्टिव्हिटी पाहिल्या. त्यानंतर त्याच्या अकाउंटमधून 64 लाख रुपये चोरी झाले.

  नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी : कोरोना काळात डिजीटल ट्रान्झेक्शनमध्ये मोठी वाढ झाली. तर दुसरीकडे ऑनलाइन फ्रॉड्सचं (Online Fraud) प्रमाणही वाढलं आहे. याबाबत जागरुकता असूनही दिवसेंदिवस या आकड्यांमध्ये वाढच होत आहे. अशाच ऑनलाइन फ्रॉडमुळे एका व्यवसायिकाचे तब्बल 64 लाख रुपये चोरी झाले आहेत. पैशांचा हा फ्रॉड नेमका कसा झाला? हे संपूर्ण प्रकरण जयपूरमधील आहे. काही दिवसांपूर्वी जयपूरमधील एका व्यवसायिकाने आपल्या स्मार्टफोनवर दोन दिवस सतत काहीतरी विचित्र अॅक्टिव्हिटी पाहिल्या. त्यानंतर त्याच्या अकाउंटमधून 64 लाख रुपये चोरी (Businessman Lost 64 Lakhs) झाल्याचं समोर आलं. हे प्रकरण सीम स्वॅपिंग फ्रॉड (SIM Swaping Fraud) बाबत असल्याचं समोर आलं. इतकी मोठी रक्कम चोरी झाल्यानंतर व्यवसायिकाने पोलिसांत संपर्क केला. पोलिसांनी हा हॅकिंगचा प्रकार असल्याची शक्यता वर्तवली.

  हे वाचा - SIM Swap Fraud: सीम कार्डद्वारे रिकामं होऊ शकतं बँक अकाउंट,या गोष्टी लक्षात ठेवा

  असा झाला ऑनलाइन फ्रॉड - जयपूरमधील व्यापाऱ्याच्या स्मार्टफोनचे सिग्नल शुक्रवारी अचानक गायब झाले. कितीतरी वेळ वाट पाहूनही सिग्नल परत न आल्याने त्यांनी नवं सीम कार्ड घेण्याचा निर्णय घेतला. हीच बाब त्यांच्या बिजनेस पार्टनरसह घडली. त्यांचाही मोबाइल सिग्नल गेला होता.

  हे वाचा - यासाठी चुकूनही स्कॅन करू नका QR Code, Online Payment वेळी या गोष्टी लक्षात ठेवाच

  दोघांनी नवं सीम कार्ड घेण्याचा निर्णय घेतला. नवं सीम कार्ड घेतलं, पण ते अॅक्टिव्हेट होण्यासाठी बराच काळ गेला. त्यानंतर दोघांनी आपल्या फोनमध्ये कंपनीच्या आणि पर्सनल अकाउंट्समध्ये लॉगइन केलं. पण लॉगइन करता येत नव्हतं. लॉगइन होत नसल्याने त्यांनी बँकेत विचारणा केली अकाउंट बॅलेन्सबाबत माहिती विचारली. त्यावेळी त्यांच्या अकाउंटमधून 64 लाख रुपये चोरी झाल्याचं समजलं. त्यानंतर त्यांच्या अकाउंटमध्ये केवळ 700 रुपये राहिले. आता पोलीस याबाबत पुढील तपास करत असून स्मार्टफोनमधील संपूर्ण अॅक्टिविटीवर लक्ष ठेवत आहेत.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Cyber crime, Online fraud, Tech news

  पुढील बातम्या