मुंबई, 24 फेब्रुवारी- जगभरात गुगल क्रोम (Google Chrome) हा सर्वात लोकप्रिय आणि आघाडीच्या इंटरनेट ब्राउझरपैकी (internet browsers) एक आहे. 2021 मध्ये गुगल क्रोमचे जगभरात अंदाजे 3.2 मिलियन युजर्स होते. PC आणि स्मार्टफोन (Smart Phones) दोन्हीवर मोठ्या प्रमाणावर वापरलं जाणारं गुगल क्रोम युजर्सना सुरक्षित आणि त्रास-मुक्त इंटरनेटचा अनुभव देण्यात मदत करण्यासाठी अनेक फीचर्स उपलब्ध करून देतं. परिणामी, Google Chrome एक सुरक्षित ब्राउझिंग मोड ऑफर करतं. हा मोड युजर्ससाठी एक चांगला आणि सुरक्षित पर्याय आणतो, ज्यामुळे युजर्सचा इंटरनेटवरील अनुभव अधिक सुरक्षित होतो. याव्यतिरिक्त, एनहॅन्स सेफ ब्राउझिंग मोड (enhanced safe browsing mode) युजर्सना वेबवर मालवेअरचा हल्ला होण्याची शक्यता खूप कमी करतं. गुगल Google Android युजर्ससाठी आणि Google Chrome च्या सर्व डेस्कटॉप एडिशनसाठी सेफ ब्राउझिंग मोड ऑफर करतं. तर, iOS आणि iPad युजर्सना अद्याप Chrome वर सेफ ब्राउझिंग मोड मिळालेला नाही. तुमची सिस्टीम Google Chrome सुरक्षित ब्राउझिंग मोडसाठी पात्र असल्यास, ती तुमच्या सिस्टमवर कशी अॅक्टिव्ह करावी, हे जाणून घेण्यासाठी खालील टिप्स वाचा. 1. Google Chrome ब्राउझर उघडा. Chrome UI (User-interface) वर असलेल्या तीन डॉटवर टॅप किंवा क्लिक करा. 2. उपलब्ध सर्व ऑप्शन्सपैकी choose Settings > Security and Privacy on the left > Security निवडा. 3. येथे, तुम्हाला सिक्युरिटीच्या तीन वेगवेगळ्या लेव्हल आढळतील. No protection, Standard protection, and Enhanced protection. 4. या तीनपैकी Enhanced Protection निवडा आणि ते enable करा. आता, एकदा तुम्ही एनहान्स्ड प्रोटेक्शन मोड एनेबल (enhanced protection mode) केल्यावर Google Chrome तुम्हाला काय ऑफर करेल याबद्दल जाणून घेऊया. 1. Google Chrome वेबसाइट तपासेल आणि संभाव्य धोकादायक URL च्या (potentially dangerous) सूचीसह त्यांची गणना करेल. 2. हा मोड तुमच्या ई-मेल आणि पासवर्डसह (passwords) तुमची वैयक्तिक माहिती (personal information), डेटा नियमांच्या उल्लंघनांमध्ये (data breaches) समाविष्ट आहे का ते तपासते, आणि वेबवर (web) असं उल्लंघन झाल्यास तुम्हाला सूचना पाठवेल. 3. Google Chrome एनहान्स सेफ ब्राउझिंग मोड तुमच्यासोबत फ्रॉड किंवा सायबर क्राइम होण्याची शक्यता 35 टक्क्यांनी कमी करतं. 4. शिवाय हा मोड additional security measuresच्या माध्यमातून संभाव्य धोकादायक URL ओळखतो. तर, अशाप्रकारे गुगल क्रोम तुम्हाला सेफ इंटरनेट ब्राउझिंगचा अनुभव देण्यासाठी हा मोड देत आहे. तुम्हीही गुगल क्रोम वापरत असाल आणि हा मोड एनेबल केला नसेल तर वर दिलेल्या टिप्स फॉलो करून तो ऑन करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.