नवी दिल्ली, 28 सप्टेंबर : तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल, फोटो काढण्यासाठी चांगला फोन घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. 108 मेगापिक्सल कॅमेरा असणारा स्मार्टफोन तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. 108 मेगापिक्सलचा कॅमेरा स्मार्टफोन बजेटमध्ये खरेदी करता येऊ शकतो. Xiaomi चा Mi 10i 5G फोन Amazon वर कमी किंमतीत खरेदी करता येईल. हा फोन 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज, तसंच 8GB+128GB अशा दोन वेरिएंटमध्ये येतो. याची किंमत 21,999 रुपये आहे. परंतु SBI क्रेडिट कार्डद्वारे ग्राहकांना या फोनवर इन्स्टंट डिस्काउंट मिळू शकतो.
Xiaomi च्या Mi 10i 5G फोनची खास बाब म्हणजे या फोन 108 मेगापिक्सल कॅमेरा. हा फोन Pacific Sunrise, Atlantic Blue आणि Midnight Black अशा तीन रंगात उपलब्ध आहे.
Xiaomi Mi 10i 5G Specifications -
- 6.67 इंची फुल HD+ (2400 x 1080 पिक्सल) रेजोलूशन डॉट डिस्प्ले
- फोनच्या सुरक्षेसाठी फ्रंट आणि बॅक कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5
- क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसर
- अँड्रॉईड बेस्ट MIUI 12
- फिंगरप्रिंट सेंसर
- 4820mAh बॅटरी
- 33W फास्ट चार्जर
कॅमेरा -
शाओमीच्या या लेटेस्ट Mi 10i 5G फोनमध्ये चार रियर कॅमेरे देण्यात आले आहेत.
- अपर्चर f/1.75 सह 108 मेगापिक्सल प्रायमरी (Samsung HM2) सेंसर
- अपर्चर f/2.2 सह 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड-अँगल
- 2 मेगापिक्सल मॅक्रो सेंसर
- 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर
- सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटला 16 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.
फोनला -X52 5G मॉडेम, 5G कनेक्टिविटी सपोर्ट, ड्यूल-स्टीरियो स्पीकर्स, 3.5 mm हेडफोन जॅक, USB Type-C port, IR सेंसर देण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Smartphone, Tech news, Xiaomi, Xiaomi redmi