नवी दिल्ली, 27 सप्टेंबर : स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo ने आज एका व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये Oppo Reno 6 Pro 5G दिवाळी एडिशन स्मार्टफोन लाँच केला. त्याशिवाय या इव्हेंटमध्ये Oppo F19s स्पेशल एडिशन आणि Oppo Enco Buds Blue देखील लाँच केले गेले.
Oppo Reno6 Pro 5G Diwali Edition Specifications -
Oppo Reno6 Pro 5G दिवाळी एडिशन स्मार्टफोन Majestic Gold रंगात उपलब्ध करण्यात आला आहे. या फोनमध्ये Bokeh Flare पोर्टेट व्हिडीओ मोड, AI Highlight व्हिडीओ आणि Reno Glow सह अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. फोनला MediaTek Dimensity 1,200 चिपसेट सपोर्ट असेल. तसचं 65W SuperVOOC flash चार्जिंगही देण्यात आलं आहे. फोन ColorOS 11.3 वर काम करेल.
Oppo F19s स्पेसिफिकेशन्स -
Oppo F19s स्मार्टफोन 5000mAh बॅटरी आणि 33W फ्लॅश चार्जिंग टेक्नोलॉजीसह लाँच करण्यात आला आहे. Oppo F19s स्पेशल एडिशनमध्ये एक नवं AG डिजाइन देण्यात आलं आहे. स्मूथ फिंगरप्रिंट रजिस्टेंट सरफेस देण्यात आला आहे.
Oppo F19s ची किंमत Oppo F19 pro च्या 21,990 किंमतीपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. 6.43 इंची full HD+ AMOLED display, Qualcomm Snapdragon 662 SoC, 6GB of RAM आणि 128GB of इंटरनल स्टोरेज फोनला देण्यात आला आहे.
This festive season, Go Bold with Glowing Gold of #OPPOF19s. The sleekest 5000mAh battery smartphone is here with 33W Flash Charge, AMOLED Display, 48MP triple camera and many more. Priced at ₹19,990. Buy now and avail exciting offers*: https://t.co/ogCfEpocvF pic.twitter.com/zBxkHUuKz8
— OPPO India (@OPPOIndia) September 27, 2021
Oppo Enco Buds स्पेसिफिकेशन्स -
Oppo Enco Buds ब्लू कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. यात 24 तासांपर्यंतची बॅटरी, नॉइज कॅन्सलेशन टेक्नोलॉजी देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Oppo, Oppo smartphone, Tech news