नवी दिल्ली, 26 सप्टेंबर : भारतात Smartphone ची मोठी क्रेझ असून अनेक कंपन्या ग्राहकांच्या गरजांनुसार, आवडीनुसार, बजेटनुसार विविध प्रकारचे फोन लाँच करत असतात. भारत स्मार्टफोनची सर्वाधिक विक्री होणारा देश आहे. Redmi ने नुकताच भारतात आपला नवा फोन Redmi 9 Activ लाँच केला आहे. हा फोन भारतात सेलसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. या फोनची सर्वात खास बाब म्हणजे फोनला MediaTek Helio G35 प्रोसेसर, मोठा रॅम आणि 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. तुलनेने या फोनची किंमतही कमी आहे.
Redmi 9 Activ फोनच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 9,499 रुपये आहे. तर या फोनच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 10,999 रुपये आहे.
Redmi 9 Activ फोन तीन कलर ऑप्शन कार्बन ब्लॅक, कोरल ग्रीन आणि मेटॅलिक पर्पल रंगात उपलब्ध आहे. हा फोन खरेदी करायचा असल्यास ग्राहक Mi.com, mi home आणि mi studio स्टोर्समधून खरेदी करू शकतात.
Redmi 9 Activ Specifications -
- 6.5 इंची HD+ डिस्प्ले
- मीडियाटेक हीलियो G35 प्रोसेसर
- 64GB इनबिल्ट स्टोरेज
- अँड्रॉईड 11 बेस्ड MIUI 12
- फोनला रियर फिंगरप्रिंट स्कॅनर
- 5000mAh बॅटरी
- 10W चार्जिंग सपोर्ट
- 64.9 x 77.07 x 9.0 mm आणि 194 ग्रॅम वजन
कॅमेरा सेटअप -
Redmi 9 Activ मध्ये रियल डुअल कॅमेरा सेटअप आहे. या फोनला 13 मेगापिक्सल प्रायमरी सेंसरसह 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर आहे. तसंच स्मार्टफोनला स्क्रिनवर वॉटरड्रॉप नॉचमध्ये 5 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Xiaomi, Xiaomi redmi